भाजप आणि शिवसेनेत खटके उडणं काही संपता संपत दिसत नाही. भाजप आणि शिवसेनेचे नेते हे एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. रविवारी किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यात आरोपांच्या फैरी झडत होत्या. आता संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे.
ADVERTISEMENT
भाजपने अंधाऱ्या विहिरीत उडी मारली आहे. भाजपचं राजकारण निराश मनाने होतं आहे. अशा लोकांच्या नशिबी शेवटच्या क्षणापर्यंत निराशाच येते. यामुळे काहीही झालं तरीही भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 2024 ला जी निवडणूक होईल तेव्हा दिल्लीचं चित्र बदलून जाईल. भाजपने महाराष्ट्र विसरून जावा. त्यांचे उमेदवार 75-100 जिंकतील. पण भविष्यात महाविकास आघाडी सत्तेत असेल. पुढची 25-30 वर्षे तरी भाजपची सत्ता येणार नाही. तोपर्यंत भाजप राहिल की नाही माहित असाही टोलाही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत म्हटले की आमच्या तिन्ही पक्षांनी नगराध्यक्ष निवडणून आणण्यासाठी पत्रक जारी केलं आहे. तीन पक्षांनी एकत्र येऊन ही भूमिका केली आहे. स्थानिक राजकारणाच्या नावाखाली अनेकदा भ्रष्ट हातमिळवण्या होत असतात. युतीत असतानाही आमच्या काही लोकांनी केल्या होत्या. अशा प्रकारची मनमानी चालणार नाही. शिवसेनेकडून असं काही होऊ नये यासाठी आम्ही पूर्ण दक्षता घेत आहोत असंही ते म्हणाले.
उत्तर प्रदेशात शिवसेनेच्या उमेदवार अर्ज बाद करण्यात आले. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली पण भाजप अडचणीत असल्यामुळे आयोग आमच्या तक्रारी दखल घेत नाही. पुरावे समोर ठेवून आयोग सुनावणीही करायला तयार नाही. ही मनमानी आणि हुकूमशाही आहे. निवडणूक आयोग गुलाम झाल्याचं लक्षण आहे अशीही टीका संजय राऊत यांनी केली.
ADVERTISEMENT