lok sabha election 2022 : ‘6 महिन्यांपूर्वीच प्लॅनिंग झालं’; श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघावर भाजपचा दावा

मुंबई तक

• 01:18 PM • 06 Sep 2022

भाजपने २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केलीये. भाजपनं देशातील १४४ लोकसभा मतदारसंघ निवडले असून, या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार जिंकून आणण्याची रणनीती भाजपनं तयारी केलीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या कल्याण मतदारसंघही यादीत असून, या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार निवडून आणण्याची तयारी सुरू केली आहे. तशी माहिती भाजप आमदारानेच दिली आहे. […]

Mumbaitak
follow google news

भाजपने २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केलीये. भाजपनं देशातील १४४ लोकसभा मतदारसंघ निवडले असून, या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार जिंकून आणण्याची रणनीती भाजपनं तयारी केलीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या कल्याण मतदारसंघही यादीत असून, या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार निवडून आणण्याची तयारी सुरू केली आहे. तशी माहिती भाजप आमदारानेच दिली आहे.

हे वाचलं का?

भाजपनं निवडलेल्या लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री जाणार असून, कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर येणार आहेत. अनुराग ठाकूर चक्क तीन दिवस कल्याण लोकसभा मतदारसंघात मुक्कामी असणार आहे.

भाजपनं २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी आधीपासूनच सुरू केली होती. मात्र, दोन महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या सत्तांतरामुळे समीकरणं बदलली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार असतानाच भाजपनं महाराष्ट्रातील १६ लोकसभा मतदारसंघांची निवड करत लक्ष केंद्रीत केलं आहे. यात कल्याण लोकसभा मतदारसंघही आहे.

‘पवारांचं २०२४ ला विसर्जन करायचं’; सुप्रिया सुळेंना वरमाय म्हणत गोपीचंद पडळकरांचं टीकास्त्र

महाराष्ट्रातील १६ लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे केंद्रीय मंत्री दौरा करणार आहेत. केंद्रीय मंत्री स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या कामाचा आढावा तसेच नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन पक्षबांधणीचं कामाचा आढावा घेणार आहेत. कल्याण लोकसभा क्षेत्रातील डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर या शहरांमध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे ११,१२,१३ सप्टेंबर असे तीन दिवस असणार आहेत.

तीन शहरांतील चार मतदारसंघ आणि ग्रामीण भागात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर जाणार आहेत. यामध्ये नागरिक, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासोबत बैठका घेणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही तयारी सुरू आहे.

भाजप उमेदवार निवडून आणण्यासाठी नियोजन -आमदार संजय केळकर

अनुराग ठाकूर यांच्या दौऱ्याबद्दल भाजपने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. भाजप आमदार संजय केळकर दौऱ्याविषयी बोलताना म्हणाले, ‘या ठिकाणाहून कमळ निवडून गेलं पाहिजे असे भारतीय जनता पार्टीचे नियोजन आहे. या लोकसभा १००% तयार झाल्या पाहिजेत. पुढच्या लोकसभा निवडणुकीसाठी असे काम आमच्याकडून सुरू झाले आहे’, असं केळकर यांनी सांगितलं.

Devendra Fadnavis : “भाजप आणि शिवसेना ओरिजनल मुंबई महापालिकेवर भगवा फडकवणार”

दिल्लीत सहा महिन्यांपूर्वीच प्लॅनिंग झालं; केरळकर काय म्हणाले?

कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजप दावा करणार का? असा प्रश्न केळकर यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, ‘राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघातून कमळ निवडून गेलं पाहिजे. दिल्लीत याचं प्लॅनिंग सहा महिन्यांपूर्वीच झालं आहे. त्या दृष्टीने काम चालू झालेलं आहे’, असं केरळकर यांनी स्पष्ट केलं.

    follow whatsapp