आरपीआय असताना भाजपला मनसेची गरज नाही; रामदास आठवलेंचा दावा

मुंबई तक

• 05:04 PM • 14 Feb 2022

1992 साली आरपीआयच्या गटाने काँगेससोबत मुंबई महापालिकेत सत्ता आणली होती. यावेळी ही सत्ता आणू, असा दावा करत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपला मनसेची गरज नाही, असं म्हटलं आहे. राज्यात वारंवार मनसे-भाजप युतीचा मुद्दा चर्चेत आलेला आहे. त्याचबरोबर भाजपकडूनही त्यावर भूमिका स्पष्ट केलेली असताना रामदास आठवलेंनी केलेल्या विधानाची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेनं काँग्रेस व […]

Mumbaitak
follow google news

1992 साली आरपीआयच्या गटाने काँगेससोबत मुंबई महापालिकेत सत्ता आणली होती. यावेळी ही सत्ता आणू, असा दावा करत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपला मनसेची गरज नाही, असं म्हटलं आहे. राज्यात वारंवार मनसे-भाजप युतीचा मुद्दा चर्चेत आलेला आहे. त्याचबरोबर भाजपकडूनही त्यावर भूमिका स्पष्ट केलेली असताना रामदास आठवलेंनी केलेल्या विधानाची चर्चा सुरू झाली आहे.

हे वाचलं का?

शिवसेनेनं काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर भाजप मनसेला जवळ करणार का? अशी चर्चा राज्यात गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. दोन्ही पक्षांच्या भेटीही अधून होत असतात. त्यामुळे हा विषय चर्चेतही येतो. मात्र, दोन्ही पक्षांनी सोबत येण्याबद्दलही भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत. अशातच केंद्रीय राज्यमंत्री आणि आरपीआय ए गटाचे नेते रामदास आठवले यांनी भाजपला मनसेची गरज नसल्याचं विधान केलं आहे.

“मुंबई महापालिका निवडणुकीत आरपीआय भाजपासोबत असल्याने मनसेची भाजपला आवश्यकता नाही. ते मनाने आमच्या सोबत येणार नाही. 1992 साली आरपीआयच्या गटाने काँगेससोबत मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन केली होती. यावेळी ही सत्ता आणू,” आठवले यांनी म्हटलं आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे सरकार 10 मार्चनंतर सत्तेत नसेल असं विधान केलं होतं. त्यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले, “हे सरकार कधी पडणार हे माहीत नाही, पण हे सरकार पडले पाहिजे”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे सातत्याने भाजपवर टीका करताना दिसत आहे. त्यांच्याबद्दल बोलताना आठवले म्हणाले, “संजय राऊत माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्या बोलण्यामुळे शिवसेनेवरच निगेटिव्ह परिणाम होतं आहे.”

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात पक्षाची भूमिका मांडली. भाजप वगळता सर्व पक्षांसाठी आघाडीसाठी आमचे दरवाजे खुले आहेत, असं आंबेडकर म्हणाले होते. त्यावरुन आठवले यांनी टोला लगावला. “प्रकाश आंबेडकर यांनी भाजपासाठी दारे बंद केली असली, तरी आमचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले आहेत”, असं आठवले म्हणाले.

    follow whatsapp