PM Narendra Modi यांची जादू ओसरली? ३ राज्यातील निकाल भाजपसाठी का चिंताजनक?

मुंबई तक

03 Mar 2023 (अपडेटेड: 26 Mar 2023, 05:09 PM)

Election Results:  त्रिपुरा, मेघालय, नागालँड या तीन राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल (Assembly Election Result) नुकतेच जाहीर झाले. यात त्रिपुरामध्ये भाजपने (BJP) सत्ता राखली आहे. तर मेघालय आणि नागालँडमध्येही सत्तेत भागीदारी मिळाली आहे. या यशानंतर काल (गुरुवारी) सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही (PM Narendra Modi) भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना आनंद व्यक्त केला. (PM Narendra […]

Mumbaitak
follow google news

Election Results: 

हे वाचलं का?

त्रिपुरा, मेघालय, नागालँड या तीन राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल (Assembly Election Result) नुकतेच जाहीर झाले. यात त्रिपुरामध्ये भाजपने (BJP) सत्ता राखली आहे. तर मेघालय आणि नागालँडमध्येही सत्तेत भागीदारी मिळाली आहे. या यशानंतर काल (गुरुवारी) सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही (PM Narendra Modi) भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना आनंद व्यक्त केला. (PM Narendra Modi| Why are the results in the 3 state worrying for the BJP?)

पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले, नवं पर्व आणि नवा इतिहास घडवण्याचा हा क्षण आहे. निवडणूक जिंकण्यापेक्षाही मला समाधान आहे की, पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात मी ईशान्य भारतात वारंवार जाऊन लोकांची मनं जिंकली आहेत. आमच्या काही हितचिंतकांना चिंता वाटते की भाजपच्या विजयाचं नेमकं रहस्य काय आहे? मी निकाल लागेपर्यंत टीव्ही पाहिला नव्हता आणि ईव्हीएमच्या बोलं लावणं सुरु झाले की नाही हे पाहिलेलं नाही.

Sanjay Raut Controversy: ”मी त्यांना चोरमंडळ म्हटलं…”, संजय राऊतांच स्पष्टीकरण

पण तरीही भाजपसाठी हा निकाल चिंताजनक का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संपूर्ण भारतीय जनता पक्ष या विजयोत्सवात आनंदी असला तरीही भाजप काहीसा चिंतेत आहे. त्रिपुरामध्ये भाजपने सत्ता राखली आहे. पण या निवडणुकीत भाजपचा सहयोगी पक्ष आयपीएफटीच्या ७ आणि स्वतः भाजपच्या ४ जागा कमी झाल्या आहेत. याशिवाय भाजपच्या मतांची टक्केवारीही कमी झाली आहे. २०१८ मध्ये भाजपने त्रिपुरात ४३ टक्के जागा मत मिळवत ३६ जागा जिंकल्या होत्या. तर २०२३ मध्ये भाजपने ३८ टक्के मत मिळवत ३२ जागा जिंकल्या आहेत. मतांची कमी झालेली टक्केवारी आणि घटलेल्या जागा यामुळे हा निकाल भाजपसाठी काहीसा चिंताजनक आहे.

नागालँड आणि मेघालयमध्ये सत्तेत सहभागी :

भाजप-एनडीपीपी युतीला नागालँडमध्ये बहुमत मिळाले आहे. पण सलग दुसऱ्या निवडणुकीत भाजपच्या जागा मात्र जेवढ्याच्या तेवढ्याच राहिल्या आहेत. केवळ मतांच्या टक्केवारीत वाढ झाल्यामुळे भाजपला काहीसा दिलासा मिळाला आहे. २०१८ मध्ये भाजपने नागालँडमध्ये २० जागा लढविल्या होत्या. यापैकी १५.३ टक्के मत घेत १२ ठिकाणी विजय मिळविला होता. तर यंदाही भाजपने २० जागा लढवून १२ ठिकाणी विजय मिळविला आहे. केवळ मतांच्या टक्केवारीत ३ टक्के वाढ होऊन १८.८१ टक्के मत मिळविली आहेत.

कसब्यात BJPचा ‘करेक्ट कार्यक्रम’ नेमका केला तरी कोणी?, वाचा इंटरेस्टिंग माहिती

दुसरीकडे, मेघालयमध्ये एनपीपी सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. एनपीपीने भाजपकडे सत्तेसाठी पाठिंबा मागितला होता. त्यानंतर भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी तात्काळ राज्य भाजपला एनपीपीला पाठिंबा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे केवळ दोन जागा मिळूनही भाजप मेघालयमध्ये सत्तेत सहभागी होणार आहे. भाजपने २०१८ मध्ये मेघालयमध्ये ४७ पैकी २ जागा जिंकल्या होत्या. तर ९.६ टक्के मत मिळविली होती. यंदाही भाजपने ९. ३३ टक्के मत घेत दोन जागा जिंकल्या आहेत. तसंच मतांच्या टक्केवारीत काहीसी घसरण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सलग दोन निवडणुकांमध्ये

    follow whatsapp