नंदुरबार: ‘कोरोनाच्या संकटात राज्यात राज्य सरकारनं दीड वर्ष लॉकडाऊन केलं आहे. मात्र सरकारने व्यापारीवर्ग, त्यात काम करणारे मजूर यांच्यासाठी एक रुपयाचा पॅकेज देखील जाहीर केलं नाही. याबाबत विचारणा केली असता आरोग्यमंत्री वेगळं मत व्यक्त करतात तर मुख्यमंत्री त्या मताला ग्राह्य धरत नाही. त्यामुळे संपूर्ण राज्य सरकारचा भोंगळ कारभार सुरू आहे.’ अशी टीका भाजपा नेते आशिष शेलार यांनी केली आहे. नंदुरबार जिल्ह्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ADVERTISEMENT
नंदुरबार जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात वाढलेल्या कुपोषणाच्या मुद्यावर विधानसभेत चर्चा झाली पाहिजे होती परंतु तसं झालं नाही. नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषणाची स्थिती धोकादायक आहे. मात्र राज्य सरकार याकडे डोळेझाकपणा करत असून हा मुद्दा विरोधी पक्षनेते यांनी लावून धरला असताना देखील याकडे सत्ताधारी पक्षांन दुर्लक्ष केले आहे. अशी प्रतिक्रिया देखील शेलार यांनी दिली आहे.
तर नवाब मलिक काही तरी बोलायचं म्हणून बोलतात, सरकार काम करत नसल्याने राज्यपाल यांना हस्तक्षेप करावा लागत आहे. राज्यपाल नियमात राहून काम करत आहे. असंही यावेळी शेलार म्हणाले.
तसेच पुढे बोलताना भाजपा नेते अशिष शेलार यांनी सांगितले की, सरकारने जाहीर केलेलं पॅकेज जेव्हा जनतेपर्यंत पोचेल तेव्हा खरं. तातडीची मदत अजून मिळाली नाही तर पॅकेजचे काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
याचवेळी मुंबईत विमानतळावरील अदानी कंपनीच्या नावाची तोडफोड प्रकरणी देखील त्यांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले, ‘विमानतळाचे हस्तांतरण राज्य सरकारने केलं आणि आंदोलन ही शिवसेनाच करत आहे. विमानतळ हस्तांतर करीत असताना अटी-शर्ती का टाकल्या नाहीत? राज्य सरकार आणि अदानी यांची मिलीभगत आहे. टक्केवारीसाठी आंदोलन झाले. असा घणाघाती आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.
Flood Relief Package : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय,पूरग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटींच्या पॅकेजला मंजुरी!
त्याचप्रकारे संजय राऊत यांच्या पंतप्रधान चहा-पाण्याला बोलवत नाही या वक्तव्यावर आशिष शेलार यांची शिवसेनेवर टीका केली आहे. ‘चहा-पाण्यावर जनतेचे प्रश्न सुटत नाही ते चहापाणी पक्ष आहेत. आंदोलन जनतेत जाऊन करायची असतात चहा-पाण्यासाठी नाही. अशी बोचरी टीका देखील भाजपा नेते शेलार यांनी केली आहे.
ADVERTISEMENT