मी दोन अडीच वर्षांपासून सांगत होतो की आपलं सरकार येईल. ते सांगायला मी काही वेडा नव्हतो. त्यासाठी योजना बनवत होतो असा खुलासा भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर पुणे भाजपकडून चंद्रकांत पाटील यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी त्यांनी हे वक्तव्या केलं आहे. अडीच वर्षांपासून शिवसेना फोडण्याची तयारी सुरू होती का? या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे यांचंही कौतुक केलं आहे.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे की, एकनाथ शिंदे… जनतेच्या कोर्टात कुणाचा दसरा मेळावा ठरला भारी?
नेमकं काय म्हटलं आहे चंद्रकांत पाटील यांनी?
“मी दोन-अडीच वर्षांपासून सांगत होतो की आपलं सरकार येईल, मी हे सांगायला काही वेडा नव्हतो. काही ना काही संदर्भ माझ्या मनात होते. त्याची योजना माझ्या मनात होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला कार्यकर्त्यांना विश्वास द्यायचा होता. ४० जणांना फोडणं सोपं नव्हतं. त्यासाठी वेळ लागणार होता. त्यासोबत तशी संधी येणं महत्त्वाचं असतं. योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती वेळ साधली. त्यानंतर आपलं सरकार आलं. असा खुलासा भाजप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे… धनुष्यबाण चिन्हाशिवाय निवडणूक झाल्यास फायदा कोणाला?
एकनाथ शिंदेंचं चंद्रकांत पाटील यांनी केलं कौतुक
एकनाथ शिंदेंचं चंद्रकांत पाटील यांनी कौतुक केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयासाठी धाडस लागतं. त्यामुळे आम्ही त्यांना अंतर जाणवू देणार नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. २१ जूनला महाराष्ट्रात बंड झालं. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड पुकारलं. त्यानंतर शिवसेन दुभंगली आहे. शिवसेनेत एक ठाकरे गट आणि दुसरा शिंदे गट असे दोन गट पडले आहेत.
महाविकास आघाडी सरकारवर टीका
महाविकास आघाडीचं सरकार जे महाराष्ट्रवर आलं होतं त्या सरकारने अनेक चांगल्या निर्णयांना स्थगिती दिली. आपण जे प्रकल्प सुरू केले होते ते रद्द करण्याचं काम त्यांच्या सरकारने केलं. असाही आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. मला जेव्हा पक्षाने पुण्यात पाठवलं तेव्हा अनेकांनी मला नावं ठेवली होती. मात्र तुम्ही अशा लोकांकडे लक्ष देऊ नये. मला पुण्यात पाठवताना दिल्लीत पूर्णपणे विचार करण्यात आला होता असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT