Pooja Chavan Suicide Case: ‘मला तर पूर्ण विश्वास आहे कि तो तोच आहे’, चित्रा वाघ यांचा नेमका निशाणा कुणावर

मुंबई तक

• 08:15 AM • 02 Aug 2021

मुंबई: शिवसेना आमदार आणि माजी मंत्री संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांचे कॉल रेकॉर्डिंग पुणे पोलिसांच्या हाती लागल्यानंतर आता संजय राठोडांच्या अडचणी वाढल्या आहेत. अशावेळी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. पोलिसांना मिळालेल्या कॉल रेकॉर्डिंगनुसार त्यांना असा संशय आहे की, पूजा चव्हाणचं ते संभाषण हे संजय राठोड यांच्यासोबतच सुरु होतं. पण […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: शिवसेना आमदार आणि माजी मंत्री संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांचे कॉल रेकॉर्डिंग पुणे पोलिसांच्या हाती लागल्यानंतर आता संजय राठोडांच्या अडचणी वाढल्या आहेत. अशावेळी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. पोलिसांना मिळालेल्या कॉल रेकॉर्डिंगनुसार त्यांना असा संशय आहे की, पूजा चव्हाणचं ते संभाषण हे संजय राठोड यांच्यासोबतच सुरु होतं.

हे वाचलं का?

पण अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली मात्र असं असताना चित्रा वाघ यांनी असं म्हटलं आहे. ‘मला तर पूर्ण विश्वास आहे कि तो तोच…’ असं म्हणत चित्रा वाघ यांनी थेट संजय राठोड यांच्याकडेच बोट दाखवलं आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पूजा चव्हाण आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्यात फोनवरुन जे संभाषण झालं होतं त्याच्या अनेक रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. या रेकॉर्डिंगमध्ये एक कॉल हा तब्बल 90 मिनिटे सुरु होता. जो पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या करण्याच्या चार ते पाच दिवसांपूर्वीचा होता.

या कॉलमधील आवाज संजय राठोडांशाी मिळता जुळता असल्याचा संशय देखील पोलिसांना आहे. मात्र, दुसरीकडे चित्रा वाघ यांचं म्हणणं आहे की, संशय नाही तर आपल्याला खात्री आहे की, दुसरी व्यक्ती ही दुसरी-तिसरी कुणीही संजय राठोडच आहे.

चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या?

याचबाबत चित्रा वाघ यांनी याबाबतची बातमी पाहिल्यानंतर आपल्या सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना असं म्हटलं आहे की, ‘पुण्यातील तरुणीने आत्महत्येपूर्वी संजय राठोडशी फोनवरुन संभाषण केल्याचा पोलिसांना संशय… ‘त्या’ तरु/णीचं फोन संभाषण पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती मिळतीये…’

‘मला तर पूर्ण विश्वास आहे कि तो तोच… सत्य परेशान हो सकता है पराजित नही…जय हो…’अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी चित्रा वाघ यांनी संजय राठोडांविरोधात प्रचंड रान पेटवलं होतं. पूजाच्या आत्महत्येनंतर त्या स्वत: पुण्यात गेल्या होत्या. जिथे पूजा राहत होती. त्यानंतर त्यांनी तिथे पत्रकार परिषद घेऊन अत्यंत आक्रमकपणे संजय राठोड आणि महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला होता. यामुळे संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास त्यांनी सरकारवर प्रचंड मोठा दबाव निर्माण केला होता.

Pooja Chavan suicide case: पूजा चव्हाण-संजय राठोड यांच्यातील ‘ती’ कॉल रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती?

पूजाने 7 फेब्रुवारी 2021 रोजी पुण्यात राहत असलेल्या इमारतीतून उडी मारुन आत्महत्या केली होती. ज्यानंतर दोन दिवसांनी काही फोन कॉल रेकॉर्डिंग हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यानंतर विरोधी पक्षाने याप्रकरणी आवाज उठवत सरकारवर जोरदार टीका केली. अखेर याचप्रकरणी दबाव वाढल्याने संजय राठोड यांना 28 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

    follow whatsapp