Pankaja Munde म्हणतात “मी पदासाठी वाट…” विधानपरिषद उमेदवारीवरून मोठं वक्तव्य

मुंबई तक

• 07:26 AM • 03 Jun 2022

काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना राज्यसभेची उमेदवारी मिळू शकते अशा काही चर्चा रंगल्या होत्या. मात्र भाजपने दोन्ही राज्यसभा उमेदवारांची नावं जाहीर केली आणि या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. आता विधान परिषद निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा होते आहे. याबाबत त्यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे. काय म्हणाल्या पंकजा मुंडे? पक्ष काय […]

Mumbaitak
follow google news

काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना राज्यसभेची उमेदवारी मिळू शकते अशा काही चर्चा रंगल्या होत्या. मात्र भाजपने दोन्ही राज्यसभा उमेदवारांची नावं जाहीर केली आणि या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. आता विधान परिषद निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा होते आहे. याबाबत त्यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे.

हे वाचलं का?

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

पक्ष काय निर्णय घेईल ते आगामी काळात बघू. दिल्लीत मला मंत्रिपद मिळावं असं अनेकांना वाटतं माझ्याविषयी लोकांची ही इच्छा आहे. सध्या नावं चर्चेत आहेत. मात्र पक्ष काय निर्णय घेईल ते कळेलच. तेव्हाचं तेव्हा पाहू असं म्हणत पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यसभा असेल किंवा विधान परिषद असेल त्यासाठी तुमच्या नावाची चर्चा होते आहे मग पक्ष संधी देत नाही का? की तुम्हाला संधी मिळत नाही? हा प्रश्न विचारला असता पंकजा मुंडे म्हणाल्या की “मला कुठल्याही संधीची अपेक्षा नाही. कुठल्या संधीसाठी मी प्रयत्नही करत नाही. संधी मिळावी यासाठी वाट पाहणाऱ्या राजकारण्यांमध्ये मी नाही. जे मिळतं त्याची संधी करून दाखवणं, संधीचं सोनं करून दाखवणं हे माझं काम आहे आणि हेच माझे संस्कार आहेत.

गोपीनाथ मुंडे यांनी जी पदं भुषवली त्या पदांना त्यांनी आणखी मोठं केलं. संधीसाठी रांगेत वाट पाहणं ही माझी प्रवृत्ती नाही” असं उत्तर पंकजा मुंडे यांनी दिलं.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज आठवा स्मृती दिन आहे. बीडमधल्या गोपीनाथ गड या ठिकाणी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित राहणार आहेत. याबाबतही पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं आहे. शिवराज सिंह आज महाराष्ट्रात येत आहेत. ओबीसी समाज, वंचितांसाठी ज्यांनी आयुष्य वेचलं अशा नेत्याच्या समाधी स्थळी ते येत आहेत. शिवराज सिंह चौहान हे OBc समाजाचं भविष्य सुरक्षित करणारे नेते आहेत. असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp