Tata Airbus : उद्धव ठाकरेंना प्रसाद लाड यांचा इशारा, “मला तोंड उघडायला लावू नका नाहीतर..”

मुंबई तक

• 09:49 AM • 28 Oct 2022

वेदांता फॉक्सकॉननंतर एअरबस टाटा हा २२ हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. त्यावरून राजकारण चांगलंच रंगताना दिसतं आहे. हा प्रकल्प नागपूरच्या मिहानमध्ये सुरू व्हावा असा शिंदे फडणवीस सरकारचा प्रयत्न होता. मात्र आता एक मोठा प्रकल्प पुन्हा गुजरातला गेल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षांनी सरकारवर टीका केली आहे. दुसरीकडे […]

Mumbaitak
follow google news

वेदांता फॉक्सकॉननंतर एअरबस टाटा हा २२ हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. त्यावरून राजकारण चांगलंच रंगताना दिसतं आहे. हा प्रकल्प नागपूरच्या मिहानमध्ये सुरू व्हावा असा शिंदे फडणवीस सरकारचा प्रयत्न होता. मात्र आता एक मोठा प्रकल्प पुन्हा गुजरातला गेल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षांनी सरकारवर टीका केली आहे. दुसरीकडे भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे आणि सुभाष देसाई यांना मला तोंड उघडायला लावू नका असा इशारा दिला आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे प्रसाद लाड यांनी?

महाविकास आघाडी जनतेची दिशाभूल करत आहे. २१ सप्टेंबर २०२१ मध्येच एअरबस- टाटा प्रकल्प परत गेला होता. मला तर तेव्हाच्या उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना तेव्हा प्रकल्प का नाकारला गेला हे विचारायचं आहे. सुभाष देसाई यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर भूषण देसाई कुणाला भेटत होता? दुबईत कशा बैठका होत होत्या? मातोश्रीवर किती टक्के पोहचवायला सांगितलं होतं? हे सगळं आम्ही सांगत बसलो तर प्रकरण मोठं होईल. आम्हाला तोंड उघडायला लावू नका.

सुभाष देसाई वयाने मोठे आहेत म्हणून आदर

सुभाष देसाई यांनी आमच्या सरकारवर आरोप करण्याआधी स्वतःच्या टोपलीत काय आहे ते पाहावं. सुभाष देसाई वयाने मोठे आहेत त्यामुळे आम्ही शांत आहोत. ते ज्येष्ठ असल्याचा आदर आम्हाला आहे. मात्र आम्ही पुराव्याशिवाय बोलत नाही. नवाब मलिक, अनिल देशमुख यांचा भ्रष्टाचार सिद्ध झाला आहे. सुभाष देसाईंचा आदर करतो पण त्यांनी फडणवीस आणि शिंदे यांच्याबाबत बोलण्याआधी विचार करावा असंही प्रसाद लाड यांनी सुनावलं आहे.

आदित्य ठाकरे या आरोपांवर काय म्हणाले?

टक्केवारीचा आरोप जो प्रसाद लाड यांनी केला त्यावर आदित्य ठाकरेंना विचारलं असता त्यांनी मी असल्या लोकांना आणि आरोपांना महत्त्व देत नाही म्हणत एका ओळीत हा विषय संपवला आहे. तसंच खोके सरकारने आणखी एक प्रकल्प कसा घालवला हे सांगत एकनाथ शिंदेंवर त्यांनी टीका केली आहे.

    follow whatsapp