कुवरचंद मंडले, नांदेड: ‘आरएसएस, बजरंग दल आणि भाजपचा (BJP) भारताच्या संस्कृतीवर विश्वास नाही. राज्यघटनेच्या मूलभूत कर्तव्यात जे समाविष्ट आहे ते भाजपाला मान्य नाही, म्हणूनच यांना समान नागरी कायदा (Uniform Civil Code) आणायचा आहे. भारताच्या विविधतेतील एकतेचे हे मूल्य, जे भारताचे सर्वात मोठे सौंदर्य आहे, ते भाजपच्या लोकांना मान्य नाही, म्हणूनच आरएसएसला (RSS) भारताची (India) ओळख मिटवायची आहे.’ अशी टीका एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी नांदेडमध्ये केली. (bjp wants erase identity of india uniform civil code mim asaduddin owaisi criticized nanded latest political news maharashtra)
ADVERTISEMENT
असदुद्दीन ओवेसी यांनी 2010 च्या नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी शहरातील देगलूर नाका परिसरात एका विनापरवाना मेळाव्याला संबोधित केले होते. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी 9 जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली यात ओवेसी यांचेही नाव आहे. या कारवाईत आज न्यायमूर्तींनी ओवेसींना 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यासाठीच ओवेसींनी आज नांदेड न्यायालयात हजेरी लावली होती.
असदुद्दीन ओवेसी नेमकं काय म्हणाले?
प्रसारमाध्यमांशी बोलताना ओवेसी म्हणाले, 60 टक्के लोकांची संपत्ती 20 टक्के लोकांकडे आहे, यावर केंद्र सरकारचे नियंत्रण नाही, सरकार नेमकं काय करतेय? आजवर देशात हिंदू कुटुंबांना टॅक्स डिबेट मिळायची ती इतरांना का मिळत नाही? असाही सवाल ओवेसींनी केला आहे. समान नागरी कायदा लागू झाल्यास हिंदू विवाह कायदा, सोबतच अन्य काही गोष्टी अडचणीत येतील..
हे ही वाचा >> सोलापूर : दहावीतील विद्यार्थ्याने नववीतील मुलाकडून 10 लाख कसे उकळले?
नागालँड, मिझोराम, या आदिवासी प्रदेशाचा या कायद्यात अंतर्भाव करायचा नाही, असे अमित शहा म्हणाले होते, मग गुजरात, नागपूरचे आदिवासी आदिवासी नाहीत का? तुम्ही त्यांच्यासाठी काय कराल, हे मला आरएसएसला विचारायचे आहे. अशीही टिप्पणी ओवेसींनी केली.
हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून हिंदूना मिळालेली जीवनशैली समान नागरी कायद्याच्या माध्यमातून काढून टाकली जाईल. मुस्लिमांना टार्गेट केले जाते आहे. 2020 चा डेटानुसार, 1 लाख 80 हजार मुस्लिम महिला, स्त्रिया उच्च शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडल्या. मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती बंद झाली, मौलाना आझाद फेलोशिप बंद झाली. देशाच्या शिक्षणमंत्र्यांना मला विचारायचे आहे, मुस्लिम महिला सशक्त बनविण्याची आपली मोहीम गेली कुठं? असा सवालही ओवेसींनी केला आहे.
हे ही वाचा >> Shiv Sena vs NCP: सुनील तटकरेंचं मोठं विधान, गोगावलेंसाठी ‘गुड न्यूज’; पण..
पाकिस्तानमधील सीमा हैदरचा विवाह लव्ह जिहाद नाही का?
‘पाकिस्तानातून आलेल्या सीमाचे लग्न सचिनसोबत झाले आहे. पासपोर्टशिवाय ती त्याच्यासोबत राहते. भाजपने धर्मांतरावर कडक बंदी आणली. मग हा लव्ह जिहाद नाही का? ती भारतात कशी आली, बीएसएफला कळले नाही का?, अमित शहांना माहित नसावे का.? तिने अगोदरच्या पतीला न सोडता लग्न कसे केले.? तिने कोणत्या कायद्यानुसार लग्न केले आणि ते भाजपला चालते का..? यात अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. ती महिला रॉ एजेंट आहे अशीही चर्चा सुरू आहे. यावर चांगला चित्रपट बनू शकतो, अशीही टिपण्णी ओवेसी यांनी यावेळी केली आहे.
ADVERTISEMENT