त्यांचा बापही मतमोजणी रोखू शकणार नाही- संजय राऊत

मुंबई तक

• 11:38 AM • 10 Jun 2022

मुंबई: राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदार पार पडली आहे. आता प्रतिक्षा फक्त निकालाची आहे. त्यापुर्वी भाजपने तीन आमदारांच्या मतांवर आक्षेप घेतल्यामुळे मतमोजणीला उभीर होत आहे. महाविकास आघाडीचे यशोमती ठाकूर, जितेंद्र आव्हाड, सुहास कांदे या आमदारांच्या मतांवर आक्षेप घेतला होता. तर महाविकास आघाडीने भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्या मतावर आक्षेप घेतला आहे. त्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदार पार पडली आहे. आता प्रतिक्षा फक्त निकालाची आहे. त्यापुर्वी भाजपने तीन आमदारांच्या मतांवर आक्षेप घेतल्यामुळे मतमोजणीला उभीर होत आहे. महाविकास आघाडीचे यशोमती ठाकूर, जितेंद्र आव्हाड, सुहास कांदे या आमदारांच्या मतांवर आक्षेप घेतला होता. तर महाविकास आघाडीने भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्या मतावर आक्षेप घेतला आहे. त्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे वाचलं का?

संजय राऊत विधान भवनाच्या पायऱ्यांवर उभे असताना पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तप देताना म्हणाले ”त्यांचा बापही मतदान रोखू शकणार नाही”. संजय राऊतांनी नाव न घेता भाजपवरती निशाणा साधला आहे. दरम्यान नवाब मलिक, अनील देखमुख आणि शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके वगळता सर्वच विधानसभेतील आमदारांनी मतदान केले आहे.

शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यामध्ये सहाव्या जागेसाठी लढत आहे. थोड्याच वेळात निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होण्यास विलंब होण्याचे मुख्य कारण म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतमोजणीची परवानगी घ्यावी लागते. भाजपने जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर, सुहास कांदे यांनी नियमबाह्य मतदान केल्याचा आक्षेप भाजपने घेतला आहे.

आव्हाड, ठाकूर आणि कांदे यांची मते बाद करावीत अशी मागणी भाजपच्या निवडणूक अधिकारी योगेश सागर आणि अतुल सावे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. नियमबाह्य मतदानाच्या आक्षेपावर केंद्रीय निवडणूक आयोग जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत मतमोजणी सुरू होणार नाही. भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनीही नियम बाह्य मत केल्याचा महाविकास आघाडीचा आक्षेप आहे. केंद्रीय निवडणूक आयोग अधिकारी ऑनलाईन मीटिंगमध्ये सहभागी झाले आहेत. काँग्रेस आणि भाजप हरकती मांडत आहेत.

    follow whatsapp