Gujarat Election BJP: मुंबई: भारतीय जनता पक्ष हा सलग 25 वर्षांहून अधिक काळ गुजरातमध्ये सत्तेवर आहे. तरीही प्रत्येक निवडणूक पहिलीच असल्याप्रमाणे भाजप रणनिती आखते. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी देखील गुजरातमध्ये 40 हून अधिक जाहीर सभा घेतल्या. ज्या-ज्या ठिकाणी मोदींचा प्रभाव आहे त्या-त्या ठिकाणी भाजपला जिंकणं सोप्पं आहे. त्या दृष्टीने आपण पाहिलं की, मुंबई महापालिकेत भाजपचे जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्यासाठी हा मोठा धडा आहे. कारण येत्या काही काळात मुंबई महापालिका निवडणुका जाहीर होतील. जिथे प्रचारासाठी मोदी नक्की येतील.
ADVERTISEMENT
गुजराती मतदारांसाठी नरेंद्र मोदी सर्वस्व आहेत. ज्या-ज्या वेळी मोदींवर काँग्रेसने हल्ला चढवलाय तेव्हा-तेव्हा मोदींनी निवडणूक त्वेषाने लढवली आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी गुजराती मतदार हे नरेंद्र मोदींच्या पाठिशी ठामपणे उभे राहिल्याचे दिसून येतं.
Sanjay Raut: ‘तुम्ही दिल्ली घ्या, आम्ही..,’ राऊतांचा भाजप आणि AAP वर गंभीर आरोप
‘आप’ सर्व पक्षांसाठी धोक्याची घंटा?
आप हा पक्ष फक्त भाजपसाठी नव्हेच तर सर्वच पक्षांसाठी धोक्याची घंटा ठरु शकतो. आपमध्ये क्षमता आहे मात्र ते अद्यापही ही ते काही राज्यांपुरताच मर्यादित आहेत. तसंच मुस्लिम मतदार आपकडून पुन्हा काँग्रेसकडे वळायला लागलं असल्याचं दिल्ली महापालिका निवडणुकीत पाहायला मिळालं आहे. तरीही आपसाठी राष्ट्रीय पक्ष म्हणून अद्याप लांबचा प्रवास आहे. पण त्यांची वाटचाल सुरु झालीए एवढं नक्की.
काँग्रेसने गुजरातचं मैदान सोडून दिलेलं?
काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकीत जवळजवळ मैदान सोडून दिल्याचं चित्र दिसत होतं. काँग्रेस नेतृत्वाने पूर्णपणे स्थानिक नेत्यांवर ही निवडणूक सोपवून टाकली होती. तर दुसरीकडे आपचे अरविंद केजरीवाल हे गुजरातमध्ये बरेच दिवस ठाण मांडून होते. त्यांनी या निवडणुकीत बराच प्रचारही केला. पण काँग्रेसच्या नेतृत्वाने गुजरातसारख्या महत्त्वाच्या राज्यातील निवडणूक अजिबात गांभीर्याने घेतली नाही. ज्याचा मोठा फटका काँग्रेसला बसताना पाहायला मिळतोय.
पुढील वर्षी महानगर पालिकाच्या निवडणुका होतील त्यानंतर मे महिन्यात कर्नाटक आणि डिसेंबरमध्ये छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राज्यस्थानच्या निवडणुका होतील. या पार्श्वभूमीवर आजच्या निकालाचा नेमका अर्थ लावताना काँग्रेससारख्या पक्षाला 2024 च्या निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी प्रचंड जोर लावावा लागेल.
Gujrat Election: “सगळ्यांनी ऐका, आज जे गुजरातमध्ये घडलं तेच उद्या मुंबई महापालिकेत घडणार”
2024 साठी ‘आप’ची नवी रणनिती?
2024 सालच्या लोकसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची ठरु शकते. आपची सध्या दोन राज्यात सत्ता आहे. तर दोन राज्यात त्यांचे काही आमदार आहेत. त्यामुळे प्रादेशिक पक्ष ही झूल आपने दूर सारली आहे आणि 2024 दिशेने त्यांनी आतापासूनच सुरुवात केली आहे.
असं असलं तरीही पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळालेली आप आता त्यांचं विकासाचं मॉडेल कसं राबवतात यावर त्याचं 2024 निवडणुकीतील बरंच गणित अवलंबून असणार आहे. त्यामुळे ‘आप’ला राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी उत्तर भारतासह इतर राज्यांमध्ये एक वेगळी व्यवस्था उभी करावी लागेल. ज्याचा मोठा फायदा त्यांना भविष्यात होईल.
2024 ला काँग्रेसचा टिकाव लागणार?
दुसरीकडे आजचे हे निकाल राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेससाठी नक्कीच विचार आणि चिंतन करण्यालायक आहेत. एकीकडे 2024 निवडणुकांसाठी भाजपने मागील काही दिवसांपासूनच तयारी केलीए. तर दुसरीकडे काँग्रेस अद्यापही निराशेच्या गर्तेतच अडकून पडल्याचं पाहायला मिळतंय. अशावेळी काँग्रेस नेतृत्वाला आपल्या पक्षाला या गर्तेतून बाहेर काढून नवसंजीवनी द्यावी लागेल. तरच 2024 मध्ये त्यांचा टिकाव लागणं शक्य आहे अन्यथा काँग्रेसचं काही खरं नाही…
ADVERTISEMENT