मुंबई: कोरोनाचे (Corona) रुग्ण कमी होत असताना Break The Chain चे नवे नियम शासनाने जाहीर केले असून आता 14 जूनपासून नवे नियम लागू होणार आहेत. ज्यानुसार महाराष्ट्रातल्या (Maharashtra) अनेक जिल्ह्यांमध्ये अनलॉक होणार आहे. मात्र असं असलं तरीही मुंबई महापालिकेने (BMC) मात्र सर्व काही हळूहळूच सुरु करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
ADVERTISEMENT
कारण अद्यापही मुंबईत (Mumbai) अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा हा इतर जिल्ह्यांच्या मानाने जास्तच आहे. त्यामुळे मागील आठवड्यात जे नियम होते तेच नियम मुंबईसाठी पुढील काही दिवस तरी कायम असणार आहेत.
14 जून पासून महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यांमध्ये होणार Unlock
सध्या मुंबई महानगरपालिका हद्दीत कोव्हिड-19 पॉझिटिव्हिटी रेट हा 4.40 टक्के इतका आहे. तर ऑक्सिजन बेड व्याप्तीचा दर हा 27.12 टक्के एवढा आहे. यानुसार सध्या मुंबई दुसऱ्या लेव्हलमध्ये आहे. मात्र, काही गोष्टी लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने लेव्हल-3 चे नियम कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईला लेव्हल-3 मध्येच ठेवण्याचा निर्णय महापालिकेने का घेतला?
1. मुंबई शहराची भौगोलिक रचना व लोकसंख्येच्या घनतेचे प्रमाण
2. मुंबई महानगर प्रदेशातून लोकल ट्रेनने दाटीवाटीने प्रवास करुन मोठ्या संख्येने मुंबई शहरात दररोज येणारे प्रवासी
3. भारतीय हवामान खात्याने मुंबई शहर परिसरात येत्या काही दिवासत दिलेला अतिवृष्टीचा इशारा
Unlock News : तुमचा जिल्हा कधी होणार अनलॉक? जाणून घ्या सविस्तर…
या सर्व बाबी लक्षात घेऊन कोव्हिड-19 प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करण्यात अडचणी येण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई महापालिका हद्दीत लेव्हल-3 चे जे नियम आधी लागू करण्यात आले होते तेच नियम पुढील आदेशापर्यंत कामय राहणार आहेत.
तिसऱ्या लेव्हलमध्ये येणाऱ्या जिल्ह्यांसाठी नेमके कोणकोणते निर्बंध?
संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सर्व अत्यावश्यक दुकानं सुरु ठेवण्यात येतील. इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत सुरु असतील तर शनिवार-रविवारी बंद असतील.
याव्यतिरीक्त मॉल्स-थिएटर्स सर्व बंद राहतील, सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स 50 टक्के क्षमतेनं दुपारी 2 पर्यंत खुली राहतील आणि त्यानंतर पार्सल सेवा देता येणार आहे. मॉर्निंक वॉक, मैदाने, सायकलिंग पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत मुभा, 50 टक्के क्षमतेनं खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
सरकारकडून Unlock ची नियमावली जाहीर, परंतू निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक जिल्हा प्रशासनाला
सोमवार ते शनिवार स्टुडियोत चित्रीकरण करता येणार आहे. मनोरंजन कार्यक्रम 50 टक्के क्षमतेसह दुपारी 2 पर्यंत खुले असणार आहेत. बांधकामांना दुपारी दोन पर्यंत मुभा असणार आहे. जमावबंदी/संचारबंदी कायम राहणार आहे.
ADVERTISEMENT