मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होते आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रात आता आरोग्य व्यवस्थाही अपुरी पडेल अशी भीती खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी झालेल्या टास्ट फोर्सच्या बैठकीत व्यक्त केली. यादरम्यान ठाकरे यांनी प्रशासनाला लॉकडाउनची तयारी करण्याचे आदेश दिलेत. तर दुसरीकडे BMC ने देखील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन शहरातील सर्व सरकारी, खासही हॉस्पिटल्स, नर्सिंग होम, कोविड सेंटर यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
ADVERTISEMENT
‘मातोश्रीवर बसून सर्वसामान्यांचा त्रास कसा कळणार? लॉकडाउनला आमचा कडवा विरोध’
मुंबई महापालिकेने एक विशेष पत्रक काढत शहरातील सर्व हॉस्पिटल्सना सज्ज राहण्याचे आदेश देत एक नियमावली जाहीर केली आहे. ज्यात आपल्या हॉस्पिटल्समधील बेड्सची संख्या वाढवण्यापासून ते औषधांचा साठा पुरेसा आहे की नाही हे तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
उद्धवजी आता परत लॉकडाउन नको ! संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
१) प्रत्येक वॉर्ड लेव्हलवर कोरोनाबाधित रुग्णांना योग्य पद्धतीने बेड्स मिळतील याची काळजी घेणं.
२) शहरातील प्रत्येक हॉस्पिटल्सनी आपली बेड्सची क्षमता वाढवून कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज रहावं.
३) प्रत्येक वॉर्डातील Assistant Commisioner ने आपल्या भागातील हॉस्पिटल्स, नर्सिंग होममधील बेड हे कोविड १९ च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ताब्यात घ्यावेत.
४) गरज पडल्यास सर्व प्रक्रीया योग्य पद्धतीने पार पडण्यासाठी Assistant Commisioner पोलिसांची मदत घेऊ शकतात.
५) या स्थानिक हॉस्पिटल्स आणि नर्सिंग होममध्ये रुग्णांना बेड्स मिळत आहेत की नाही हे तपासण्यासाठी शिक्षक किंवा इतर कर्मचाऱ्यांची शिफ्ट लावण्यात यावी.
६) वॉर्ड लेव्हलवरील वॉर रुमला सांगितल्याशिवाय कोणालाही बेड्स देता येणार नाहीत.
७) सहव्याधी नसलेल्या आणि कोरोनाची सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांऐवजी ज्यांना तातडीची गरज आहे अशा रुग्णांनाच पहिल्यांदा खासगी आणि स्थानिक हॉस्पिटल्समध्ये बेड्स द्यावेत.
८) खासगी हॉस्पिटल्समधील कोरोनासाठीच्या एकूण बेड्सपैकी ८० टक्के बेड्स आणि ICU मधील १०० टक्के बेड्स हे वॉर रुमच्या माध्यमातून येणाऱ्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात यावेत. या बेड्सवर हॉस्पिटल रुग्णांना थेट प्रवेश देऊ शकत नाही.
९) प्रत्येक हॉस्पिटल्सने महाराष्ट्र सरकारच्या नियमांनुसार रुग्णांकडून बिल आकारावं.
१०) प्रत्येक कोविड फॅसिलीटी सेंटरने आपल्या केंद्रातील ऑक्सिजनचा पुरवठा, व्हेंटिलेटरची उपलब्धता या सर्व गोष्टी तपासून घ्याव्यात. याचसोबत औषधं, पीपीई कीट, मास्क, VTM कीट यांचा साठा करुन ठेवावा.
११) प्रत्येक कोविड सेंटरचं स्ट्रक्चरल ऑडीट आणि फायर ऑडीट लवकरात लवकर करवून घ्यावं.
१२) या नियमांचा भंग झाल्यास हॉस्पिटल्स आणि कोविड सेंटरवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
ADVERTISEMENT