केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अधीश बंगला बांधकाम प्रकरणी मुंबई महापालिकेची नोटीस

मुस्तफा शेख

• 01:48 AM • 07 Mar 2022

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आणि भाजप आमदार नितेश राणेंची सहा तासांपेक्षा जास्त चौकशी करण्यात आल्यानंतर आता नारायण राणेंना पुन्हा एकदा मुंबई महापालिकेने नोटीस पाठवली आहे. मुंबईतल्या अधीश बंगला प्रकरणात ही नोटीस धाडण्यात आली आहे. मुंबईतल्या जुहू भागात हा बंगला आहे. या बंगल्यात अतिरिक्तपणे अनधिकृत बांधकाम केलं गेलं आहे असं नोटीसमध्ये म्हटलं आहे. मातोश्री २ […]

Mumbaitak
follow google news

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आणि भाजप आमदार नितेश राणेंची सहा तासांपेक्षा जास्त चौकशी करण्यात आल्यानंतर आता नारायण राणेंना पुन्हा एकदा मुंबई महापालिकेने नोटीस पाठवली आहे. मुंबईतल्या अधीश बंगला प्रकरणात ही नोटीस धाडण्यात आली आहे. मुंबईतल्या जुहू भागात हा बंगला आहे. या बंगल्यात अतिरिक्तपणे अनधिकृत बांधकाम केलं गेलं आहे असं नोटीसमध्ये म्हटलं आहे.

हे वाचलं का?

मातोश्री २ चं बेकायदा काम पैसे देऊन रेग्युलर करण्यात आलं, नारायण राणेंचा आरोप

काय म्हटलं आहे नोटिशीत?

नारायण राणे यांच्या मुंबईतल्या जुहू येथील अधीश बंगल्यात अनधिकृत बांधकाम आणि काही फेरबदल करण्यात आले आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर जो गार्डन एरिया आहे तिथे रूम बांधण्यात आली आहे. तिसरा मजला, पाचवा मजला आणि आठवा मजला या ठिकाणी जी गार्डन टेरेसची जागा आहे तो भागही रूम म्हणून वापरला जातो आहे. चौथा आणि सहावा मजला या ठिकाणी जो टेरेसचा भाग आहे तो देखील रूम म्हणून वापरला जातो आहे. आठव्या मजल्यावर पॉकेट टेरेस आहे तिथेही रूम बांधण्यात आली आहे. टेरेस फ्लोअर, पॅसेजचा भाग हे सगळं रूम म्हणून वापरलं जातं आहे.

या सगळ्या बांधकामांबाबत उत्तर द्या असं मुंबई महापालिकेने म्हटलं आहे. तसंच बंगल्यात हे जे काही बदल करण्यात आले आहेत त्याबाबत मुंबई महापालिकेची संमती घेतली होती का? घेतली असल्यास ती संमती कुठे आहे? याचीही विचारणा करण्यात आली आहे. रिस्क फॅक्टर म्हणून आम्ही हे बांधकाम तोडू का नये? असाही प्रश्न यात विचारण्यात आला आहे.

नारायण राणे आणि नितेश राणे यांची 6 तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी काय झालं पोलीस ठाण्यात ?

21 फेब्रुवारीला नारायण राणे यांच्या अधीश बंगल्याची पाहणी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली होती. नारायण राणे यांच्या बंगल्यात बेकायदेशीर बांधकाम झाल्याची तक्रार मुंबई महापालिकेला मिळाली होती. त्यानंतर महापालिकेच्या इमारत प्रस्ताव आणि इमारत बांधकाम विभागाच्या पथकाने या बंगल्याची दोन तास पाहणी केली होती.

नारायण राणे यांनी महापालिकेची कोणतीही संमती न घेता हे बदल अंतर्गतरित्या केले आहेत अशी तक्रार करण्यात आली होती. माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांच्या तक्रारीनंतर मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या बंगल्याची पाहणी केली होती. आता यातील बेकायदा बांधकाम प्रकरणी नारायण राणेंना उत्तर देण्यासाठी नोटीस धाडण्यात आली आहे.

फेब्रुवारी महिन्यात काय म्हणाले होते नारायण राणे?

‘जवळपास 13-14 वर्ष मी या घरात येऊन झाली आहे. या इमारतीचे आर्किटेक्ट तलाठी आहेत. जगभरात त्यांचं नाव आहे. नामांकित आर्किटेक्टने ही इमारत बांधली आहे. ती बांधल्यानंतर 1991च्या डीसी नियमाप्रमाणे ती बांधली. ताबा देण्यात आला. ऑक्युपेशन सर्टिफिकेट बीसीसी या दोन्ही गोष्टी पालिकेने दिल्या होत्या. एकही गोष्ट अपूर्ण न ठेवता 100 टक्के कायदेशीर काम मी केलं आहे. त्यानंतर एक इंचही बांधकाम मी केलेलं नाही.’

‘या घरात माझी पत्नी, मी, दोन मुलं आणि त्यांचे दोन छोटे असे आठ लोकं आम्ही राहतो. इथे कोणत्याही प्रकारे हॉटेलिंग वगैरे चालत नाही. 100 टक्के रेसिडेन्शियल इमारत आहे. आजूबाजूच्यांनाही विचारा. असं असतानाही शिवसेनेकडून, मातोश्रीकडून नोटीस लावण्याचं काम केलं गेलं. पालिका त्यांच्याकडे आहे. सातत्याने 2015-16-17 साली तक्रारी करायच्या, पालिकेकडून सगळे प्लॅन बघितले जायचे आणि काही अवैध नाही असं म्हणून उत्तर पाठवायचे.’

    follow whatsapp