बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची इमारत मुंबई महापालिकेने कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे सील केली आहे. सुनील शेट्टी अल्टामाऊंट रोडवरील पृथ्वी अपार्टमेंटमध्ये राहतो. महापालिकेच्या नियमाप्रमाणेका एका सोसायटीत ५ पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले तर ती इमारत सील केली जाते.
ADVERTISEMENT
मुंबईच्या डी वॉर्डाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी पृथ्वी अपार्टमेंट सील केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मलबार हिल, पेडर रोड यासारखे उच्चभ्रू भाग डी वॉर्डात मोडले जातात. सोसायटीत सील झाली असली तरीही सुनील शेट्टीच्या घरात कोणालाही कोरोनाची लागण झालेली नसल्याचं कळतंय. ३० मजली पृथ्वी अपार्टमेंटमध्ये एकूण १२० फ्लॅट आहेत.
दरम्यान इमारतीत ५ रुग्ण आढळल्यानंतर सुनील शेट्टीच्या परिवाराने क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राज्यात मागील 24 तासात कोरोनाचे (Corona Patients) 8535 नवे रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ही पुन्हा एकदा वाढत असल्याचं यावेळी दिसून येत आहे. यामुळे सरकार आणि प्रशासनाची चिंता देखील वाढत आहे. दरम्यान, दिवसभरात 156 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत राज्यात 1,25,878 जणांचे कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT