India Today च्या ‘ग्राऊंड रिपोर्ट’चं उदाहरण देत बॉम्बे हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारला दिल्या सूचना

विद्या

• 04:08 PM • 12 May 2021

महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात कोरोनाची जी स्थिती आहे ती योग्य रितीने हाताळा असं बॉम्बे हायकोर्टाने महाराष्ट्राला सांगितलं. यासाठी त्यांनी उदाहरण दिलं ते इंडिया टुडेच्या ग्राऊंड रिपोर्टचं. महाराष्ट्र सरकारच्या कोरोना हाताळणीबाबत हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी देत असताना बॉम्बे हायकोर्टाने इंडिया टुडेच्या ग्राऊंड रिपोर्टचं उदाहरण दिलं. थेट लसीकरण केंद्रावर जाऊन घेता येणार […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात कोरोनाची जी स्थिती आहे ती योग्य रितीने हाताळा असं बॉम्बे हायकोर्टाने महाराष्ट्राला सांगितलं. यासाठी त्यांनी उदाहरण दिलं ते इंडिया टुडेच्या ग्राऊंड रिपोर्टचं. महाराष्ट्र सरकारच्या कोरोना हाताळणीबाबत हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी देत असताना बॉम्बे हायकोर्टाने इंडिया टुडेच्या ग्राऊंड रिपोर्टचं उदाहरण दिलं.

हे वाचलं का?

थेट लसीकरण केंद्रावर जाऊन घेता येणार लस, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

न्या. दिपांकर दत्ता आणि गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने ‘इंडिया टुडेचे पंकज उपाध्याय यांनी पालघरमधल्या कोरोना हाताळणीवर भाष्य करणारी बातमी आणि ग्राऊंड रिपोर्ट तयार केला होता. तिथे खाटा नाहीत, आरोग्य सुविधा नाहीत, रूग्णांना जमिनीवर झोपायची वेळ आली आहे. हे सगळं वास्तव त्यांनी दाखवलं होतं. आपल्याा मुंबईच्या उपनगरांसोबतच ग्रामीण भागांचीही काळजी घ्यायची आहे. ग्रामीण भागात रूग्णांना योग्य आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून सरकारने योग्य त्या मार्गदर्शक सूचना लागू कराव्यात असं या खंडपीठाने म्हटलं आहे.पंकज उपाध्याय यांनी केलेला ग्राऊंड रिपोर्ट हा महत्त्वाचा आहे. डोळे उघडणारा आहे असंही या खंडपीठाने म्हटलं आहे.

Corona ची स्थिती गंभीर आहे हे विसरू नका. शहरांमध्ये सोयी सुविधा कमी पडल्या तर त्या पुरवता येतात मात्र ग्रामीण भागांचं काय? ग्रामीण भागांमध्येही आरोग्य सुविधा योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेत पोहचणं महत्त्वाचं आहे हे कोर्टाने सरकारला बजावलं आहे.

आम्हाला लसीची काय गरज आहे? मुंबईपासून हाकेच्या अंतरावर पालघरमध्ये लसीकरणाला थंड प्रतिसाद

काय होता इंडिया टुडेचा ग्राऊंड रिपोर्ट?

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना सरकारी यंत्रणा लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातही राज्य सरकार लोकांनी लवकरात लवकर लस घ्यावी यासाठी प्रयत्न करत आहे. परंतू मुंबई पासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पालघरमधील आदिवासी पाड्यांवर लोकांना लसीकरणाबद्दल फारशी माहितीच नसल्याचं कळून आलं. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघरमधील आदिवासी भागात लोकांच्या लसीकरणाबद्दल प्रतिक्रीया जाणून घेण्याचा प्रयत्न मुंबई तक ने केला. यावेळी काही धक्कादायक बाबी समोर आल्या.

मस्करपाडा नावाच्या गावात राहणाऱ्या मनोज या युवकाशी आम्ही लसीकरणाबद्दल विचारलं असता त्यानेही लसीकरणाबद्दल संभ्रम असलेलं मत व्यक्त केलं. “लघ घ्यायची की नाही हे मी अद्याप ठरवलेलं नाही. मी तरी अजून लस घेतलेली नाही. जर सरकारी अधिकारी लस द्यायला घरीच आले तर मग मी विचार करेन, पण सध्या मला लसीची गरज आहे असं वाटत नाही.” लसीकरणावरुन सरकार लोकांना घाबरवत असल्याचं मत मनोजच्या आईने व्यक्त केलं. “आमच्याकडे खायला काहीही नाहीये, सगळं काही बंद आहे. घरात तीन बाळं आहेत. लसीकरण हे आमच्यासारख्या गरीबांना घाबरवण्याचा एक कट आहे. आम्हाला लसीची गरजच काय?” अशा शब्दांमध्ये मनोजच्या आईने आपली काहीशी संतप्त प्रतिक्रीया दिली.

पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुर्साळ यांच्याशी मुंबई तक ने लसीकरणाबद्दल असलेल्या उदासीनतेबद्दल संपर्क साधला. यावेळी बोलत असताना जिल्हाधिकाऱ्यांनीही पालघरमध्ये अनेक आदिवासी पाड्यांमध्ये चुकीच्या समजूतींमुळे लोकं लस घेण्यासाठी पुढे येत नसल्याचं मान्य केलं. “बहुतांश लोकं ही चुकीच्या समजूती आणि अंधश्रद्धेमुळे लस घेण्यासाठी पुढे येत नाहीत.

    follow whatsapp