ड्रग्ज पार्टी प्रकरणात NCB च्या अटकेत असलेल्या आर्यन खानच्या अडचणी काहीकेल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. बुधवारी मुंबईच्या सत्र न्यायालयाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे त्याचा आर्थर रोड जेलमधला मुक्काम वाढला. यानंतर आर्यनच्या वकीलांनी जामीनासाठी हायकोर्टात धाव घेतली.
ADVERTISEMENT
परंतू हायकोर्टातही आर्यन खानला लगेच दिलासा मिळालेला नाहीये. मुंबई हायकोर्ट २६ ऑक्टोबरला आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी करणार आहे. आर्यनच्या वकीलांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी करण्याची विनंती हायकोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे आर्यनला तोपर्यंत आर्थर रोड तुरुंगातच रहावं लागणार आहे. २६ तारखेला मुंबई हायकोर्टात जस्टीस एन.डब्ल्यू.सांबरे यांच्यासमोर आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी होईल. आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी याबद्दल माहिती दिली.
१४ तारखेला मुंबईच्या विशेष NDPS कोर्टात आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. २० तारखेच्या सुनावणीत आर्यनला जामीन मिळेल अशी सर्वांनाच आशा होती. परंतू निकाल देताना कोर्टाने जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे २६ तारखेला हायकोर्टासमोर सुनावणीत नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Aryan Khan : आर्यनच्या भेटीसाठी शाहरुख खान पोहोचला ऑर्थर रोड तुरुंगात
दरम्यान इतरांप्रमाणे आर्यनलाही २० तारखेच्या सुनावणीत आपल्याला जामीन मिळेल अशी आशा होती. परंतू जामीन नाकारण्यात आल्याचं कळताच आर्यन प्रचंड निराश झाल्याचं कळत आहे. बुधवारी दुपारी 2.45 मिनीटांनी तुरुंग अधिकाऱ्यांनी आर्यनला कोर्टाचा हा निकाल कळवला. तुझा जामीन नाकारण्यात आला आहे असं अधिकाऱ्यांनी आर्यनला सांगितलं. ज्यानंतर तो प्रचंड निराश झाला. आर्यन त्यानंतर तुरुंगातल्या त्याच्या बराकीत गेला आणि बराच वेळ कुणाशीच काहीही बोलला नाही.
बुधवारी जामिनावर सुनावणी होणार आहे हे आर्यनला माहित होतं. तो सकाळपासून बराच सकारात्मक होता त्याला वाटलं होतं आज आपल्याला जामीन नक्की मिळेल. मात्र तो जामीन मिळाला नाही. आज जामीन नाकारण्यात आल्यानंतर आर्यन खान खूप अस्वस्थ झाला. आर्यन खानला जेलमधलं जेवणही आवडलेलं नाही. त्याच्या साथीदारांना त्याने आजही सांगितलं की मी अपराधी नाही, मी काहीही चुकीचं केलेलं नाही. आज जामीन मिळाला नाही हे समजल्यानंतर आर्यन खान प्रचंड अपसेट झाला.
Exclusive : आर्यन खान जामीन न मिळाल्याने प्रचंड नाराज, बराकीत गेला आणि…
ADVERTISEMENT