ब्रिटन (वृत्तसंस्था) : लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणार आहेत. २८ ऑक्टोबरला त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती आहे. सुनक हे भारतीय वंशाचे असून त्यांचे आजी-आजोबा भारतीय होते. याशिवाय ते इन्फोसिसचे सर्वेसर्वा नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. त्यांनी अक्षता मूर्ती यांच्याशी लग्न केलं आहे.
ADVERTISEMENT
ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे नाव देखील आघाडीवर होते. मात्र त्यांनीही आपलं नाव मागे घेतल्यानंतर सुनक यांची दावेदारी अधिक भक्कम झाली होती. त्यानंतर सुनक यांच्याविरोधात पेनी मॉर्डोंट हे उभे होते. मात्र आज सुनक यांना जवळपास १८५ संसद सदस्यांच समर्थन मिळालं, तर पेनी मॉर्डोंट यांना केवळं २५ सदस्यांचा पाठिंबा होता. परिणामी आज त्यांनी आज माघार घेतली.
पंतप्रधानपदाची आपली उमेदवारी जाहीर करताना ऋषी सुनक म्हणाले होते, त्यांना अर्थव्यवस्था सुरळीत करायची आहे, पक्षाला एकत्र करुन देशासाठी काम करायचे आहे. दरम्यान, ऋषी सुनक हे ४२ वर्षांचे असून ते ५ वेळा संसदेचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत. ब्रिटनच्या सर्वात श्रीमंत लोकप्रतिनिधींपैकी ते एक आहेत. त्यांची संपत्ती 7300 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
लिझ ट्रस यांचा राजीनामा :
यापूर्वी ऋषी सुनक यांचा पराभव करुन पंतप्रधान झालेल्या लिझ ट्रस अवघ्या ४५ दिवसांमध्येच राजीनामा दिला होता. मी जी आश्वासनं दिली होती, ती सध्याच्या स्थितीमध्ये पूर्ण करु शकले नाही, असं त्यांनी राजीनामा देताना म्हटलं होतं.
जेव्हा मी पंतप्रधान बनले त्यावेळी देशात आर्थिक अस्थिरता होती. नागरिकांना वीज बिल कसं भरायचं याची चिंता होती. आम्ही कर कपातीचं स्वप्न पाहिलं, मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया रचण्याचा प्रयत्न केला. मात्र, वर्तमानात ते शक्य नसल्यानं राजीनामा देत असल्याचही, त्या म्हणाल्या होत्या.
ADVERTISEMENT