ADVERTISEMENT
महाराष्ट्रात कोल्हापुरकरांची ओळख रांगड्या स्वभावाची लोकं म्हणून आहे. प्रत्येक बाबतीत कोल्हापूरकर आपला वेगळा ठसा उमटवतात. दिवाळीत पाडव्याच्या निमीत्ताने अशीच एक अनोखी स्पर्धा कोल्हापुरात पहायला मिळाली.
कोल्हापुरच्या कसबा बावडा परिसरात आज नेहमीप्रमाणे पाडव्याच्या मुहुर्तावर म्हशींची सौंदर्य स्पर्धा भरवण्यात आली होती.
गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेली ही परंपरा कोल्हापुरात आजही कायम आहे. आपल्या म्हशींना विविध पद्धतीने सजवून यावेळी त्यांची खास मिरवणूक काढण्यात आली.
म्हैस सजावट, गाडी मागून म्हैस पळवणे अशा स्पर्धा यावेळी इथे पार पडल्या. या स्पर्धेसाठी प्रत्येक मालकाने आपल्या म्हशीला साजश्रृंगारासह सजवलं होतं.
म्हशींनीही मालकांप्रती असलेलं आपलं प्रेम दाखवत ही शर्यत पूर्ण केली. या शर्यतीला शहरातील हजारो नागरिकांनी गर्दी केली होती.
ADVERTISEMENT