Radhakishan Damani and Dmart: मुंबई: राधाकिशन दमानी (Radhakishan Damani) यांची आज कुणालाही वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. राधाकिशन दमानी हे भारतातील आघाडीचे उद्योगपती आणि गुंतवणूकदार आहेत. फोर्ब्सच्या 2023 च्या सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत ते 8व्या क्रमांकावर आहेत. त्यांची यशोगाथा दलाल स्ट्रीटच्या माध्यमातून उद्योजकतेच्या जगात प्रवेश करते. 1980-90 च्या दशकात भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदार म्हणून ठसा उमटवणाऱ्या दमानी यांनी 2002 मध्ये रिटेल स्टोअर डी-मार्ट (D-Mart) सुरू केले होते. गेल्या आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये, राधाकिशन दमानी यांनी Dmart द्वारे तब्बल 1492 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. (businessman radhakishan damani inside story ahead in taking risks now he has big company without single rupee loan)
ADVERTISEMENT
स्टॉक ब्रोकरपासून केलेली सुरुवात
Dmart चे मार्केट कॅप आज 2,26,640 कोटी रुपये आहे. मात्र, या व्यवसायात येण्यापूर्वी दमानी हे स्टॉक ब्रोकर होते. राधाकिशन दमानी यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात स्टॉक ब्रोकर म्हणून केली होती, पण लवकरच त्यांना समजले की जर त्यांना बाजारातून पैसे कमवायचे असतील तर त्यांना या व्यवसायात उतरावे लागेल. त्यानंतर लगेचच त्यांनी भारतीय शेअर बाजारात शेअर ट्रेडिंग सुरू केले. स्टॉक ट्रेडिंगमधून त्यांनी प्रचंड नफा कमावला. बाजारातील विविध चढ-उतारांचा वापर करून नफा कमविण्यावर त्यांचा विश्वास होता.
अधिक वाचा- विषारी सापांची झुंड अन् एकटा तरूण.. ‘हा’ Video तुम्हीही बघू शकणार नाही!
रिटेल उद्योगात प्रवेश
दलाल स्ट्रीटमध्ये संमिश्र यश अनुभवल्यानंतर 2001 मध्ये, दमानी हे शेअर बाजारापासून दूर गेले आणि त्यांनी रिटेल उद्योगात प्रवेश केला. त्यांनी डीमार्ट सुपरमार्केट आणि हायपरमार्केट साखळी सुरू केली. DMart ही एक-स्टॉप सुपरमार्केट आणि हायपरमार्केट साखळी आहे, जी सगळ्यात आधी मुंबईतील पवई येथे सुरू झाली. आज ती देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. डीमार्टचे देशभरात 300 हून अधिक स्टोअर्स आहेत.
डीमार्टची खासियत
डीमार्टची खास गोष्ट म्हणजे त्यांच्या स्टोअरमध्ये वर्षभर ऑफर्स असतात. परंतु, असे असूनही कंपनी जबरदस्त नफा कमावते. राधाकिशन दमानी यांची एक कल्पना यामागे काम करते. कंपनीने कधीही भाड्याने डीमार्ट स्टोअर उघडले नाही. त्यांचे देशभरात जवळजवळ 95 टक्के डीमार्टसाठीच्या जागा या त्यांच्या मालकीच्या आहेत. याशिवाय त्यांच्या स्टोअरमध्ये अत्यंत मर्यादित ब्रँडची उत्पादने उपलब्ध आहेत. कमी ब्रँडमुळे ग्राहक गोंधळून जात नाहीत, असा कंपनीचा विश्वास आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात Dmart ची विक्री 30,976 हजार कोटी रुपये होती.
अधिक वाचा- जगातली सर्वांत महागडी नंबरप्लेट! दुसरी आलिशान कार खरेदी कराल ‘इतकी’ रक्कम
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डीमार्ट ही आता कर्जमुक्त कंपनी बनली आहे. यामागे राधाकिशन दमानी यांच्या रणनीतीचा महत्त्वाचा वाटा आहे. कंपनीने 2015 ते 2019 दरम्यान कर्ज काढून टाकण्याची योजना आखली आणि 2021 मध्ये तिला यश मिळाले. आर्थिक वर्ष 2021 मध्ये कंपनीवरील कर्ज शून्यावर आले.
ग्लॅमरपासून दूर
नेहमी पांढरे कपडे परिधान करणे, ग्लॅमरपासून दूर राहणे हे अब्जाधीश गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. दमानी यांच्याकडे मोठे निर्णय आणि जोखीम घेण्याची प्रचंड क्षमता आहे. गेल्या दोन दशकांचा प्रवास सांगतो की, दमानी यांनी जोखीम पत्करली आणि त्यांचे नशीब बदलत गेले. मार्च 2017 मध्ये एव्हेन्यू सुपरमार्केटच्या IPO नंतर, दमानी हे भारताचे रिटेल किंग म्हणून ओळखले जाऊ लागले.
राधाकिशन दमानी यांची कंपनी एव्हेन्यू सुपरमार्केट 21 मार्च 2017 रोजी स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट झाली, त्यानंतर त्यांची संपत्ती भारतातील अनेक श्रीमंत कुटुंबांपेक्षा जास्त झाली. डीमार्टचा शेअर 604.40 रुपयांवर सूचिबद्ध झाला होता, तर इश्यूची किंमत 299 रुपये ठेवण्यात आली होती.
अधिक वाचा- पतीला आई-वडिलांपासून वेगळं करणं हा मानसिक छळ: कलकत्ता हायकोर्ट
डी-मार्ट ही भारतातील सर्वात फायदेशीर कंपन्यांपैकी एक आहे. राधाकिशन दमानी आणि त्यांच्या कुटुंबाचे अव्हेन्यू सुपरमार्ट्समध्ये 80 टक्के शेअर्स आहेत. 67 वर्षांचे राधाकिशन दमानी यांनी 2002 मध्ये रिटेल व्यवसायात प्रवेश केला आणि मुंबईत पहिले स्टोअर उघडले. राधाकिशन दमानी यांना लहानपणापासूनच अकाउंटिंगचा अभ्यास करण्याची आवड होती. म्हणूनच त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी मिळविण्यासाठी बॉम्बे विद्यापीठात प्रवेश घेतला. त्यांना तीन मुली आहेत. तर राकेश झुनझुनवाला, ज्यांना भारताचे वॉरेन बफे म्हटले जाते, तेही दमानी यांना स्टॉक मार्केटमध्ये आपले गुरू मानत होते.
कॉलेज शिक्षण अर्धवट सोडलं…
1954 मध्ये राजस्थानमधील बिकानेर येथील मारवाडी कुटुंबात जन्मलेल्या राधाकिशन दमानी यांचं संपूर्ण कुटुंब हे मुंबईतील एका खोलीत राहत होतं. त्याच दरम्यान त्यांनी शेअर बाजारात ट्रेडिंग करण्यास सुरुवात केली होती. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूकदार म्हणून करिअर करण्यासाठी त्यांनी कॉलेज सोडले आणि नंतर ते देशातील सर्वात मोठे गुंतवणूकदार म्हणून प्रसिद्ध झाले. दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला राधाकिशन दमानी यांना आपला गुरू मानत.
अधिक वाचा- लग्नाला 10 वर्ष, 3 मुलं… पती-पत्नीची DNA टेस्ट झाली अन् पायाखालची सरकली जमीन…
सर्वात महागडं घर घेतलं विकत
राधाकिशन दमानी यांनी त्यांच्या ब्राइट स्टार इन्व्हेस्टमेंट्स या गुंतवणूक फर्मद्वारे पोर्टफोलिओ व्यवस्थापन देखील करतं. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, राधाकिशन दमानी यांची एकूण संपत्ती $16.7 अब्ज आहे. अलीकडेच त्यांनी दक्षिण मुंबईतील मलबार हिल्स परिसरात 1,001 कोटी रुपयांचा बंगलाही खरेदी केला आहे. देशातील सर्वात महागड्या बंगल्यांपैकी हा एक आहे.
ADVERTISEMENT