सिंगल चार्जमध्ये 520 KM धावणार ही कार!

मुंबई तक

• 01:48 PM • 06 Nov 2021

हॅचबॅक, सेडान, एसयूव्ही आणि आलिशान कारनंतर आता BYD India ने आता इलेक्ट्रिक मल्टी पर्पज व्हीकल लाँच केली आहे. या कारची खासियत म्हणजे ही सिंगल चार्जमध्ये 520 किमीपर्यंत जाऊ शकते. तसंच साईजमध्ये ही कार एखाद्या इनोव्हा कार एवढी आहे. इलेक्ट्रिक एमपीव्ही BYD E6 मध्ये 71.7kWh ची लिथियम आयन फॉस्फेट बॅटरी आहे. BYD E6 एमपीव्ही 180Nm पीक […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

हॅचबॅक, सेडान, एसयूव्ही आणि आलिशान कारनंतर आता BYD India ने आता इलेक्ट्रिक मल्टी पर्पज व्हीकल लाँच केली आहे.

या कारची खासियत म्हणजे ही सिंगल चार्जमध्ये 520 किमीपर्यंत जाऊ शकते. तसंच साईजमध्ये ही कार एखाद्या इनोव्हा कार एवढी आहे.

इलेक्ट्रिक एमपीव्ही BYD E6 मध्ये 71.7kWh ची लिथियम आयन फॉस्फेट बॅटरी आहे.

BYD E6 एमपीव्ही 180Nm पीक टॉर्क जनरेट करते. याचा टॉप स्पीड हा 130 प्रति तास एवढा आहे.

यामध्ये कंपनीने फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. ज्यामुळे या कारची बॅटरी ही फक्त 35 मिनिटात 30 ते 80 टक्के चार्ज होते.

या कारमध्ये फीचर्स देखील जबरदस्त देण्यात आले आहेत. 10.1 इंचीचा इंफोटेन्मेंट यामध्ये देण्यात आला आहे.

यामध्ये 580 लीटरचा बूट स्पेस देण्यात आला आहे. जो खूपच जास्त आहे.

BYD India ने BYD E6 कारची किंमत ही 29.60 लाख एवढी निश्चित केली आहे.

सध्या ही कार दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, विजयवाडा, अहमदाबाद, कोच्ची आणि चेन्नईमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

    follow whatsapp