कोरोना काळात नोकरी गमावल्यानंतर पुन्हा कामावर बोलवण्यात आलेल्यांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या निर्णयाची माहिती दिली. निकषांमध्ये बसणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दोन्हींकडील (कर्मचारी आणि कंपनी) पीएफ २०२२ पर्यंत केंद्र सरकार भरेल, असं अर्थमंत्र्यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं.
ADVERTISEMENT
निर्मला सीतारामन एका कार्यक्रमाला उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. ‘ज्या लोकांना कोरोना काळात आपली नोकरी गमवावी लागली, त्या लोकांचा दोन्हींकडील पीएफचा भरणा केंद्र सरकार करेल. २०२२ पर्यंत केंद्र कर्मचारी आणि कंपनी अशा दोन्हींच्या पीएफचा भरेल’, असं सांगतानाच सीतारामन म्हणाल्या.
‘ज्यांना नोकरी गमावल्यानंतर पुन्हा कामावर बोलवण्यात आलं आणि फॉर्मल सेक्टरमधील ईपीएफओ नोंदणीकृत कंपनीत कमी वेतन असलेल्यांचाच पीएफ केंद्र भरेल’, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
गेल्या वर्षी केंद्र सरकारनं आत्मनिर्भर भारत पॅकेज जाहीर केलं होतं. त्यामध्ये करण्यात आलेल्या घोषणांचा पुनरुच्चार करताना अर्थमंत्र्यांनी याबद्दल माहिती दिली. इनफॉर्मल सेक्टरमध्ये कार्यरत असलेले आणि पुन्हा शहरात परतलेल्या २५ हजारांहून कामगारांना केंद्र सरकार शहरांत १६ योजनांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देईल’, असं सीतारामन म्हणाल्या.
‘केंद्र सरकारने मनरेगाच्या निधीतही वाढ केली आहे. मनरेगा योजनेच्या बजेटमध्ये ६० हजार कोटीवरून १ लाख कोटी इतकी वाढ करण्यात आली असल्याचंही निर्मला सीतारामन यांनी नमूद केलं.
ADVERTISEMENT