माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप, सचिन वाझेंना झालेली अटक या विषयांवरुन अडचणीत आलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये आणखी एक मुद्दा आता प्रामुख्याने चर्चेला आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांनी अहमदाबादमध्ये प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी भेट घेतली. पवार आणि पटेल यांचा हा दौर पूर्वनियोजित होता. केवडिया येथील साखर संमेलनात दोघंही सहभागी होणार होते. या भेटीदरम्यान पवार आणि पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भेट घेतल्याचं कळतंय. पवार-शहांच्या या भेटीमुळे राज्यात आणखी चर्चांना उधाण आलं आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान अमित शहा यांना रविवारी पत्रकार परिषदेत पवारांसोबत झालेल्या बैठकीबद्दल विचारलं असता त्यांनीही सूचक विधान करत भेट झाल्याबद्दलची बातमी पूर्णपणे फेटाळूनही लावलेली नाही. “सर्वच गोष्टी सार्वजनिक पणे सांगितल्या जाऊ शकत नाही”, असं म्हणत अमित शहांनी नवीन चर्चेला तोंड फोडलं आहे. पवार आणि अमित शहा यांच्या भेटीत काय चर्चा झाली असेल यावरुन राजकीय वर्तुळात आता विविध अंदाज आणि तर्क लढवले जात आहेत.
२०१९ मध्ये महाराष्ट्र सत्तास्थापनेच्या घडामोडी सुरू झाल्या होत्या. मुंबई शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं सरकार येणार या दिशेने घडामोडी घडत होत्या. पण या घडामोडींमध्येच शरद पवार यांनी सत्तास्थापनेसाठी भाजपसोबतही बोलणी सुरू ठेवल्याचं समोर आलं होतं.
‘अपघाती गृहमंत्री झालात…’, राऊतांच्या टीकेवर दोनदा विचारला प्रश्न; पाहा गृहमंत्र्यांनी काय दिलं उत्तर!
या सर्व घडामोडींमध्ये एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शनिवारी अहमदाबादमध्ये होते. दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांनी मात्र अशी कुठली भेटच झाली नसल्याचा दावा केलाय. या सगळ्या चर्चा त्यांनी फेटाळून लावल्यात.
ADVERTISEMENT