देशातले लोक कोरोनाने मरत असताना Central Vista ची गरजच काय?-राहुल गांधी

मुंबई तक

• 05:11 AM • 07 May 2021

देशातले लोक कोरोनाने मरत असताना Central Vista प्रकल्पाची गरज काय असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला आहे. लॉकडाऊन सुरू असताना आणि लोक कोरोनाने मरत असताना हा प्रकल्प इतका जरूरी आहे का? या प्रकल्पाचा समावेश अत्यावश्यक सेवांमध्ये का करण्यात आला आहे? असेही प्रश्न विचारण्यात येत आहेत. सुप्रीम कोर्टात या प्रकल्पाचं बांधकाम थांबवण्यात यावं म्हणून याचिका दाखल […]

Mumbaitak
follow google news

देशातले लोक कोरोनाने मरत असताना Central Vista प्रकल्पाची गरज काय असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला आहे. लॉकडाऊन सुरू असताना आणि लोक कोरोनाने मरत असताना हा प्रकल्प इतका जरूरी आहे का? या प्रकल्पाचा समावेश अत्यावश्यक सेवांमध्ये का करण्यात आला आहे? असेही प्रश्न विचारण्यात येत आहेत. सुप्रीम कोर्टात या प्रकल्पाचं बांधकाम थांबवण्यात यावं म्हणून याचिका दाखल करण्यात आली होती. ती याचिका स्वीकारलीच गेली नाही. आता सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावरून देशातल्या आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांकडून मोदी सरकारवर टीका होते आहे. अशात राहुल गांधी यांनीही ट्विट करून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

हे वाचलं का?

मोदी सरकारने SOP ठरवण्यासाठी सात दिवस लावल्याने विदेशातली मदत लांबली, ऑक्सिजन तुटवडा वाढला

What is Central vista Project? काय आहे सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प?

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाची घोषणा सप्टेंबर 2019 मध्ये करण्यात आली होती. या प्रकल्पाच्या अंतर्गत त्रिकोणी आकाराच्या नव्या संसद भवानाची निर्मिती केली जाणार आहे. ज्या संसद भवनात 900 ते 1200 खासदारांची आसन क्षमता असणार आहे. हा प्रकल्प 2022 पर्यंत पूर्ण केला जणार आहे. 2022 मध्येच भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन असणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत पंतप्रधानांचं निवासस्थान नव्याने बांधलं जाणार असून नव्या संसदेचीही निर्मिती केली जाणार आहे. 10 डिसेंबरला या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं आहे. कोरोनाची दुसरी लाट असतानाही हा प्रकल्प हा अत्यावश्यक सेवांमध्ये गणण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचं काम थांबलेलं नाही.

Corona आणि Oxygen नियोजनाबाबत मुंबईकडून शिका, मोदी सरकारला सुप्रीम कोर्टाने सुनावलं

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचं काम कोव्हिड काळातही थांबलेलं नसल्याने आंतरराष्ट्रीय मीडियानेही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. ब्रिटिश वृत्तपत्र द टेलिग्राफने या प्रकरणी भारताचे आत्मप्रेमी पंतप्रधान असा मथळा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचं काम जिथे सुरू आहे तिथून काही अंतरावर लोक कोरोनामुळे मरत आहेत आणि तरीही हा प्रकल्प मोदींना लोकांच्या जीवापेक्षा महत्त्वाचा वाटतो आहे अशी टीका टेलिग्राफने केली आहे.

द डेलि मेलनेही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. नरेंद्र मोदींचा अहंकार हा लाखो भारतीयांच्या जीवाशी खेळ करणारा आहे. भारताच्या पंतप्रधानांना रूग्णांसाठी हॉस्पिटल उभारण्यापेक्षा सेंट्रल व्हिस्टा हा प्रोजेक्ट नव्या संसदेचं काम आणि स्वतःचं नवं निवासस्थान महत्त्वाचं वाटतं आहे ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे असं डेलि मेलने म्हटलं आहे. आता याविरोधात देशाने आवाज उठवला पाहिजे असाही उल्लेख डेलि मेलच्या वृत्तात करण्यता आला आहे.

    follow whatsapp