Serum Institute च्या अदर पुनावालांना केंद्राकडून Y दर्जाची सुरक्षा

मुंबई तक

• 02:35 PM • 28 Apr 2021

कोरोनाविरुद्धच्या लढाईत नवीन वर्षात लस बाजारात आणणाऱ्या पुण्याच्या सिरम संस्थेचे सीईओ अदर पुनावाला यांना केंद्र सरकारने Y दर्जाची सुरक्षाव्यवस्था देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या संदर्भातले आदेश जाहीर केले असून यापुढे अदर पुनावाला भारतात जिथे कुठेही जातील तिकडे CRPF चे जवान त्यांच्या संरक्षणासाठी हजर असणार आहेत. Ministry of Home Affairs has issued orders to […]

Mumbaitak
follow google news

कोरोनाविरुद्धच्या लढाईत नवीन वर्षात लस बाजारात आणणाऱ्या पुण्याच्या सिरम संस्थेचे सीईओ अदर पुनावाला यांना केंद्र सरकारने Y दर्जाची सुरक्षाव्यवस्था देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या संदर्भातले आदेश जाहीर केले असून यापुढे अदर पुनावाला भारतात जिथे कुठेही जातील तिकडे CRPF चे जवान त्यांच्या संरक्षणासाठी हजर असणार आहेत.

हे वाचलं का?

सिरम इन्स्टिट्यूटने नवीन वर्षात कोव्हिशिल्ड ही लस बाजारात आणली आहे. सध्या देशभरात लसीकरणामध्ये कोव्हिशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींचा वापर केला जात आहे. पुनावाला यांनी लस बाजारात आणल्यानंतर साहजिकच त्यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने अदर पूनावाला यांना सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे.

दरम्यान, Serum इन्स्टि्टयुटने राज्यांसाठी कोव्हिशिल्ड लसीची किंमत कमी केली आहे. सिरमचे सीईओ अदर पूनावाला यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. राज्यांसाठी आता या लसीची किंमत 400 ऐवजी 300 रूपये असणार आहे. तातडीच्या संमतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राज्यांचे लसींसाठी खर्च होणारे कोट्यवधी रूपये वाचू शकणार आहेत असंही अदर पूनावाला यांनी म्हटलं आहे.

अदर पूनावालांची आणखी एका लसीबाबत घोषणा, जूनपर्यंत येणार नवी लस?

अदर पूनावाला यांनी आणखी काय म्हटलं आहे?

कोव्हिशिल्डच्या किंमती आम्ही राज्यांसाठी कमी करतो आहोत. राज्य सरकारांसाठी कोव्हिशिल्डच्या एका लसीच्या डोसची किंमत 400 वरून 300 रूपये करत आहोत. लसीच्या कमी केलेल्या किमती तातडीने लागू करण्यात आल्या आहेत. कोव्हिशिल्डच्या लसीची किंमत कमी केल्याने देशातील नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी मदत होणार आहे असंही पूनावाला यांनी म्हटलं आहे.

सिरमच्या लसीचे जुने दर?

सिरम इन्स्टिट्युटने काही दिवसांपूर्वी भारत सरकारच्या सूचनेनुसार कोव्हिशिल्ड लसीची किंमत निश्चित केली होती.तेव्हा राज्य सरकारांना 400 रूपयांमध्ये तर खासगी रूग्णालयांमध्ये 600 रूपये प्रति डोस अशी घोषणा केली होती.

भारतात सध्या दोन लसी आहेत

भारतात कोरोना प्रतिबंध करणाऱ्या दोन लसी आहेत एक आहेत. एक आहे सिरमची कोव्हिशिल्ड ही लस आणि दुसरी लस आहे भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन. केंद्र सरकारने 18 वर्षांपेक्षा पुढील वयाच्या सगळ्यांना लस देण्याचं निश्चित केलं आहे. लसीकरणाचा तिसरा टप्पा 1 मेपासून सुरू होणार आहे.

    follow whatsapp