मागील 231 दिवसांपासून समोर न आलेले परमबीर सिंग आज समोर आले. बुधवारी ते चंदीगढमध्येच आहेत हा ठावठिकाणा कळला. त्यानंतर अटकेपासून संरक्षण मिळाल्यानंतर परमबीर सिंग हे क्राईम ब्रांचसमोर चौकशीसाठी हजर राहिले होते. तिथे सात तास त्यांची चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले सगळे आरोप फेटाळले. आता परमबीर सिंग यांना निवृत्त. न्या. के. यू. चांदीवाल यांच्या एकल सदस्यीय आयोगाने चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
ADVERTISEMENT
Video : ‘फरार’ परमबीर सिंग 231 दिवसांनी मुंबईत आल्यावर काय म्हणाले?
निवृत्त न्या. चांदीवाल यांनी सिंग यांच्या वकिलांना म्हणजेच अनुकूल सेठ यांना विचारलं की परमबीर सिंग हे चौकशीसाठी कधी हजर होतील? त्यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आलं आहे हे लक्षात असू द्या. परबीर सिंग कधी येणार ते सांगा? तसं न सांगितल्यास पोलिसाना सांगून परमबीर सिंग यांच्या उपस्थितीसाठी जामीनपात्र वॉरंट लागू करावा लागेल असंही सांगण्यात आलं आहे. आम्ही याची नोंद घेतली आहे असं सेठ यांनी म्हटलं आहे.
सचिन वाझे चा यू टर्न अनिल देशमुख यांना मिळणार दिलासा?
दरम्यान मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची उलट तपासणी करणाऱ्या आणि अनिल देशमुख यांच्या वकील अनिता कॅस्टेलिनो यांनी सचिन वाझेला प्रश्न विचारण्यासाठी वेळ मागितला आहे. त्या म्हणाल्या की माझी क्रॉस अद्याप तयार नाही, तसंच मला त्याआधी अनिल देशमुख यांच्याशीही चर्चा करायची आहे त्यामुळे मला वेळ हवा आहे. अनिल देशमुख हे 1 नोव्हेंबरला ईडीसमोर हजर झाले होते. तिथे त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना रात्री उशिरा अटक कऱण्यात आली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
न्या. चांदीवाल यांना कॅस्टिलिनो म्हणाल्या की देशमुख यांच्यासाठी प्रॉडक्शन वॉरंट जारी करण्यास वेळ लागू शकतो. कमिशनच्या रजिस्ट्रारने त्याआधी नियुक्त न्यायालयाशी संवाद साधणं आवश्यक आहे. तसंच न्यायालयाने तुरुंग अधिकाऱ्यांना त्यांना आयोगाकडे पाठवण्याचे निर्देश द्यावे लागतील. चोवीस तासांमध्ये ही प्रक्रिया पार पडू शकते. सचिन वाझेची उलट तपासणी घेण्यासाठी सध्या 29 नोव्हेंबर ही तारीख द्यावी असं अनिता कॅस्टिलिनो म्हणाल्या आहेत. तुम्हाला यासाठी 5 हजार रूपये भरावे लागतील असं चांदीवाल म्हणाले. तर निर्देश देणाऱ्या वकिलाशी बोलण्यासाठी दहा मिनिटांचा अवधी द्यावा असं सांगून 26 नोव्हेंबरला उलट तपासणी गेणार असल्याचं त्यांनी आयोगाला सांगितलं.
दरम्यान, गुरुवारी देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांची बाजू मांडणारे अधिवक्ता शेखर जगताप यांनी वाझे यांना आणखी काही प्रश्न विचारण्यासाठी आयोगाची परवानगी मागितली.परवानगी दिल्यानंतर, त्यांनी वझे यांना विचारले की 24 फेब्रुवारी 2021 रोजी मुंबई पोलिस अधिकार्यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत निवासस्थानी एक बैठक घेतली होती हे म्हणणे योग्य आहे का? त्यावर वाझे यांनी उत्तर दिले की, “होय विधानसभेत मांडल्याप्रमाणे ते चौकशीशी संबंधित होते. अशी बैठक निवडणुकीशी संबंधित होती.” जगताप यांनी पुढे विचारले की ही केवळ फेब्रुवारी 2021 मध्येच बैठक झाली होती. 24 फेब्रुवारीच्या बैठकीनंतर वाझे हे कुणालाही न भेटता मंत्र्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडले का? असा सवाल जगताप यांनी केला. ज्यावर वाझे यांनी होकारार्थी उत्तर दिले.
एसीपी संजय पाटील आणि सुबीर सरकार यांची बाजू मांडणारे अधिवक्ता हृषिकेश मुंदरगी यांनी वझे यांना 17 वर्षांनंतर पोलिस सेवेत रुजू होण्याबाबत विचारले. डीसीपी राजू भुजबळ हे समाजसेवा शाखेचे प्रभारी होते, एसीपी संजय पाटील युनिटला संलग्न होते आणि देशमुख यांच्याविरुद्ध सिंग यांनी दिलेल्या तक्रार पत्रानुसार, देशमुख यांनी पाटील आणि वाझे यांच्याकडे विविध बार आणि रेस्तराँ यांच्याकडून खंडणी उकळण्याची मागणी केली होती.
ADVERTISEMENT