ऑक्सिजन विमानाने आणता येतो का? चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल

मुंबई तक

• 11:16 AM • 14 Apr 2021

मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केलं. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंधही लावण्यात आले. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलताना राज्यात ऑक्सिजनची कमतरता असल्याचं सांगितलं. ऑक्सिजन आणण्यासाठी केंद्राची मदत घेऊन तो विमानाने आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलं होतं. यावरून आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा […]

Mumbaitak
follow google news

मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केलं. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंधही लावण्यात आले. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलताना राज्यात ऑक्सिजनची कमतरता असल्याचं सांगितलं. ऑक्सिजन आणण्यासाठी केंद्राची मदत घेऊन तो विमानाने आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलं होतं. यावरून आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

हे वाचलं का?

चंद्रकांत पाटील म्हणाले, “ऑक्सिजन कधी विमानाने आणता येतो का? हे मला काही कळतच नाही. तो महाराष्ट्रात निर्माण करावा लागेल. मात्र मुख्यमंत्री हे एका पक्षाचे प्रमुख होण्यासाठी जन्माला आलेत. मात्र पवार साहेबांनी आपल्या स्वार्थासाठी त्यांना मुख्यमंत्री केलंय. पूर्वीच्या काळात राजे ज्या पद्धतीने वेष बदलून जनतेत फिरत होते तसं उद्धव ठाकरे यांनी पीपीई किट घालून फिरलं पाहिजे. त्याशिवाय त्यांना जनतेचे प्रश्न कळणार नाहीत.”

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाशी लढताना राज्यापुढे कोणत्या अडचणी आहेत, त्यावर सरकार कशी मात करतंय याची माहिती दिली. त्याचप्रमाणे ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एक मागणी केली. परराज्यातून ऑक्सिजन विमानाने आणण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांनी मागितली होती.

सरकारने जाहीर केलेलं 5 हजार 300 कोटींचं पॅकेज ही निव्वळ धूळफेक-देवेंद्र फडणवीस

तर अजित पवारांविषयी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, कोविडची परिस्थिती गंभीर असताना अजित पवार 2-2 दिवस मतदार संघात मुक्काम करतात. याचा अर्थ अजित पवारांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. आमचा उमेदवार समाधान आवताडे विजयी होणार.” त्याचप्रमाणे 2 तारखेच्या निकालानंतर राज्यातील सत्तेला सुरुंग नक्की लागेल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

    follow whatsapp