छगन भुजबळांनी सांगितली बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेची कहाणी, म्हणाले मी गृहमंत्री…

मुंबई तक

• 02:09 PM • 08 Jul 2022

नाशिक: माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर बाळासाहेब ठाकरेंना अटक करणारे म्हणून शिवसेनेचे बंडखोर टीका करत आहेत. अशा लोकांसोबत आम्ही सरकारमध्ये कसं बसायचं असे म्हणत आहेत. याच बाबतीत छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मंडल आयोगावरून मतभेद झाल्यावर मी बाहेरपडलो. मी गृहमंत्री असताना बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची […]

Mumbaitak
follow google news

नाशिक: माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर बाळासाहेब ठाकरेंना अटक करणारे म्हणून शिवसेनेचे बंडखोर टीका करत आहेत. अशा लोकांसोबत आम्ही सरकारमध्ये कसं बसायचं असे म्हणत आहेत. याच बाबतीत छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मंडल आयोगावरून मतभेद झाल्यावर मी बाहेरपडलो. मी गृहमंत्री असताना बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची फाईल आली, मी तत्कालीन कमिशनर यांनासांगितले होते की बाळासाहेबांना अटक करायची नाही, जामीन मिळत असेल तर मिळून द्यावा” असे भुजबळ म्हणाले. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

हे वाचलं का?

पुढे भुजबळ म्हणाले “2008 मध्ये सुभाष देसाई आणि संजय राऊत हे 3-4 जण आलेले, केस संबंधी थेट बोलले नाही, पण मीसमजलो काय ते …. कोर्टात बोललो साहेब केस मागे घेतो, जज बोलले की काय करत आहात तुम्ही, ती केस काढली गेली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी निरोप दिला की तुम्हाला चहाला बोलावले आहे, नंतर काही दिवसांनी आम्ही सहपरिवार गेलो, त्यानंतरआमचे पाहिल्यासारखे प्रेम राहिले”.

“सत्तेची पर्वा नाही, सत्तेला लाथ मारू”; बंडखोर आमदाराचा किरीट सोमय्या यांना इशारा

आमचे वादविवाद आहेत, भांडणे होती, आताचे मुख्यमंत्री माझ्या शेजारी बसायचे, शिवसेना संपावी असे कोणत्याही मराठीमाणसाला वाटणार नाही. एकमेकांवर कटू प्रहार करू नये. मला असे वाटले होते की आमचे भांडण जोरदार होते, पण एक वेळआली बाळासाहेबांनी मला माफ केले. शिवसैनिकाच्या रक्तात सेना आहे, त्यामुळे तो सेनेपासून दूर जाऊ शकत नाही असे भुजबळ म्हणाले.

यावेळी बोलताना भुजबळ यांनी ओबीसी आरक्षण या विषयाकडे देखील लक्ष वेधले. “ओबीसी आरक्षणाविषयी फडणवीसयांच्याशी बोललो आहे, भाटिया कमिशनने अहवाल दिलाय, शेवटच्या टप्प्यात शिंदे व फडणवीस यांच्यावर हे काम गेलंय, आताअपेक्षा आहे की असा निर्णय व्हावा की देशभरातील ओबीसीना आरक्षण मिळावे” असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

    follow whatsapp