नगरपालिका निवडणूक आणि ओबीसी आरक्षणावर छगन भुजबळांचे मोठं वक्तव्य, म्हणाले…

ऋत्विक भालेकर

• 10:29 AM • 12 Jul 2022

मुंबई: राज्यात नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यावर राज्यात ओबीसी आरक्षणावरुन नवा वाद पेटला आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी या निवडणुका पुढे जातील असे सुतोवाच दिले आहेत. छगन भुजबळ मुंबईत माध्यमांशी बोलत होते. भुजबळ म्हणाले की कोर्टाने स्पष्ट सांगितले जिथे नॉमिनेशन सुरू झाले नाही तिथे १९ तारखेला पुढीलकारवाई करा. ओबीसी आरक्षणाला […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: राज्यात नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यावर राज्यात ओबीसी आरक्षणावरुन नवा वाद पेटला आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी या निवडणुका पुढे जातील असे सुतोवाच दिले आहेत. छगन भुजबळ मुंबईत माध्यमांशी बोलत होते. भुजबळ म्हणाले की कोर्टाने स्पष्ट सांगितले जिथे नॉमिनेशन सुरू झाले नाही तिथे १९ तारखेला पुढीलकारवाई करा. ओबीसी आरक्षणाला दिलासा मिळाला आहे. आगामी काळात निवडणूका आहेत त्यात ओबीसी आरक्षण मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राबाबत निर्णय १९ तारखेला होईल तो ऐकू. निवडणुका पुढे जाणार आहेत असेही भुजबळ म्हणाले.

हे वाचलं का?

ओबीसी आरक्षणावर (OBC Reservation) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले…

पुढे भुजबळ म्हणाले ”आम्ही जो अहवाल दिला तो स्वीकारला जाईल. मध्य प्रदेशच्या धर्तीवर अहवाल केला आहे सुप्रीम कोर्टाने मध्यप्रदेशला परवानगी दिली. महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षण लागू होईल असे भुजबळ म्हणाले. छगन भुजबळांनी यावेळी चंद्रशेखरबावनकुळे यांच्यावरही टीका करत म्हणाले ”डेटा महाविकास आघडीने तयार केला. त्यात काही त्रुटी आहेत. सुनावणीची १२ तारीखहोती. आम्ही अहवालात भूमिका मांडली आहे. आमच्या माहितीच्या आधारावर अहवाल दिला आहे.

आज तो कोर्टात मांडण्यात आला याचे श्रेय महविकास आघाडीचे आहे” असे भुजबळ म्हणाले. कालपासून शिवसेना राष्ट्रपतीपदासाठी कोणाल पाठिंबा देणार याबाबत चर्चा आहे. खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी केली आहे. त्यावर पक्षप्रमुख काय निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. भुजबळ याबाबत म्हणाले ”उद्धव ठाकरेंचे वक्तव्य येत नाही तोपर्यंत बोलणार नाही”.

सत्ता बदल झाल्यावर आपली भूमिका जनतेत जाऊन मांडली पाहिजे. कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे. स्थानिक स्वराज्यसंस्था निवडणूक लागल्या आहेत. ग्रामपंचायत नगरपालिका, महापालिका लोकप्रतिनिधी वाढतात. हा बेस आहे तो मजबूतकरायला पाहिजे कामाला लागा सांगितले आहे असे भुजबळ शरद पवारांच्या दौऱ्याबद्दल म्हणाले.

    follow whatsapp