मास्क न लावण्यावरुन मुख्यमंत्री संतापले, नाव न घेता राज ठाकरेंना सुनावलं!

मुंबई तक

• 06:03 PM • 02 Apr 2021

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२ एप्रिल) सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेला संबोधित केलं. पण याचवेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव न घेता मास्क न घालण्यावरुन बरंच काही सुनावलं. मास्क न घालणं हा काही शूरपणा नाही. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपला संताप यावेळी व्यक्त केला. राज ठाकरे हे गेले अनेक दिवस मास्क […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२ एप्रिल) सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेला संबोधित केलं. पण याचवेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव न घेता मास्क न घालण्यावरुन बरंच काही सुनावलं. मास्क न घालणं हा काही शूरपणा नाही. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपला संताप यावेळी व्यक्त केला.

हे वाचलं का?

राज ठाकरे हे गेले अनेक दिवस मास्क न घालताच सार्वजनिक ठिकाणी वावरत असल्याचं पाहायला मिळतंय. अखेर आता मुख्यमंत्र्यांनी याच मुद्द्यावरुन त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

‘मास्क न लावण्यात काय शौर्य आहे?’

‘अनेक जणांना वाटतं की मास्क का लावतोय तू? मास्क न लावण्यात काय शौर्य आहे? मी मास्क वापरत नाही, मी मास्क वापरणार नाही… काय शूर आहेस? मास्क न वापरणं या शूरता नाही. मास्क लावायला लाजण्याची गरज नाहीए. परत एकदा सांगतो लस घेतल्यानंतर सुद्धा मास्क लावायलाच पाहिजे.’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

त्यांना माझा नमस्कार आहे ! उद्धव ठाकरे राजना असं का म्हणाले??

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्याबाबत भाष्य केलं होतं. राज्यात पुन्हा लॉकडाउन लागणार का? असा प्रश्न विचारला असतान उद्धव ठाकरेंनी आमची इच्छा तर नाही, पण लोकांनी नियमांचं पालन केलं नाही तर मजबुरी आहे अशा आशयाचं उत्तर तेव्हा दिलं होतं.

उद्धव ठाकरे यांचे भाऊ आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी भाषा दिनानिमित्त एका कार्यक्रमात कोरोनाविषयक धोरणांवर सरकारवर टीका करत ‘मी मास्क घालणार नाही.’ असं सांगितलं होतं. याविषयी जेव्हा या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असताना उद्धव ठाकरे फक्त एवढंच म्हणाले होते की, ‘त्यांना माझा नमस्कार आहे.’

महाराष्ट्रासाठी पुढचे 48 तास खूप महत्त्वाचे, कारण…

दरम्यान, मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या एका पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला देखील राज ठाकरे हे मास्कशिवाय दिसले होते. यावेळी राज्यातील सर्व बडे नेते हे एकाच मंचावर उपस्थित होते. पण त्यावेळी एकट्या राज ठाकरे यांनी मास्क न घातल्याचं दिसून आलं होतं.

मी आता फक्त पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतोय, पण…: मुख्यमंत्री

आज राज्यातील जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असं म्हणाले की, ‘मी आता फक्त संपूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतो आहे. पण लॉकडाऊन जाहीर करत नाहीए. पुढील दोन दिवसात मी तज्ज्ञ लोकांशी चर्चा करणार आहे. पण पुढील काही दिवसात परिस्थिती बदलली नाही तर मात्र आपल्याला लॉकडाऊन करावाच लागेल.’ असं स्पष्टपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिघडत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (2 एप्रिल) सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं की, पुढील काही दिवसात परिस्थिती सुधारली नाही तर मात्र लॉकडाऊनची वेळ आपल्यावर येईलं.

    follow whatsapp