ADVERTISEMENT
पावसाळा म्हटलं की प्रत्येकाला कुठेतरी ट्रेकिंगला किंवा पर्यटन स्थळी फिरायला जाण्याची इच्छा होत असते.
मान्सूनच्या आगमनानंतर विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखलं जाणारं चिखलदरा हे पर्यटनस्थळ पुन्हा पर्यटकांनी फुललं आहे
धुकं आणि ढगांनी वेढलेला हा परिसर पाहण्यासाठी पर्यटक चिखलदऱ्यात गर्दी करत आहेत
टुरिस्ट स्पॉटवर गाड्यांची झालेली गर्दी पाहिल्यानंतर तुम्हाला या गोष्टीचा अंदाज आलाच असेल
समुद्रसपाटीपासून ११०० मी. उंचावर असलेल्या चिखलदऱ्याला भेट देण्यासाठी पर्यटक नेहमी उत्सुक असतात.
चिखलदऱ्यासारखं थंड हवेचं ठिकाण म्हटलं की चहा हा हवाच नाही का…?
फिरायला आलेला एक लहानगा पर्यटक चहाचा आस्वाद घेत असताना
मान्सूनच्या आगमनानंतर चिखलदऱ्याचा परिसर संपूर्णपणे धुक्यात आणि ढगांमध्ये असा हरवून गेला आहे.
लॉकडाउननंतर पर्यटनाला झालेली सुरुवात ही चिखलदऱ्यातील स्थानिकांसाठी चांगली महत्वपूर्ण ठरत आहे.
रस्त्यांवरही अशा प्रकारे धुक्याचं साम्राज्य सध्या पहायला मिळत आहे
ही वाट दूर जाते..या गाण्याच्या ओळी या फोटोला अगदी चपखल बसत आहेत
शहरात माणसांच्या गर्दीत हरवून गेलेल्या प्रत्येकाला अशा प्रकारची शांतता आवश्यक असते
धुक्यात दडून गेलेला सातपुड्याचा डोंगर…
भीमाकुंड, देवी, पंचबोल अशा प्रत्येक पॉईंवर हे अशा प्रकारचं नयनरम्य दृष्य पहायला मिळत आहे
निसर्गाचं हे विलोभनीय रुप डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो
पर्यंटकांचं स्वागत करायला काही ठिकाणी धबधबेही तयार असतात…
इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला निसर्गाच्या या मुक्तहस्ताने केलेल्या उधळणीमुळे स्वर्गसुखाचा आनंद मिळत आहे
निसर्गाचं हे रुप आपल्या डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवून ठेवताना पर्यटक…
पर्यटकांसाठी हे चित्र नवीन असलं तरीही आमच्यासाठी हे रोजचचं आहे असंच काहीसं या गाई म्हणत असतील का??
सातपुडा डोंगररांगातून कोसळणारा हा धबधबा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
धबधब्याच्या ठिकाणी झालेली पर्यटकांची गर्दी
पर्यटनाला आलं की त्यासोबत देवदर्शनही झालंच पाहिजे, नाही का…
नौकायनाचा आनंद घेताना पर्यटक
चिखलदऱ्याला भेट देण्यासाठी हा सर्वोत्तम काळ असून तुम्हालाही धकाधकीच्या रुटीनमधून ब्रेक हवा असेल तर चिखलदरा तुमची वाट पाहतं आहे.
ADVERTISEMENT