चीनचं जैविक शस्त्र आहे कोरोना? हाती आलेल्या गुप्त माहितीनुसार अमेरिकेने केला दावा..

मुंबई तक

• 08:19 AM • 10 May 2021

कोरोना व्हायरसच्याबाबत चीनने केलेल्या दाव्यांवर कुणीही विश्वास ठेवायला तयार नाही. अशात आता प्रश्न हादेखील निर्माण होतो आहे की ज्या चीनमध्ये कोरोना व्हायरस आढळून आला तो चीन सहा ते आठ महिन्यात पुन्हा एकदा रूळावर कसा काय आला? कारण भारतासह जगातले अनेक देश मागील दीड वर्षापासून कोरोनासोबत संघर्ष करत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात हाहाकार माजवला आहे. […]

Mumbaitak
follow google news

कोरोना व्हायरसच्याबाबत चीनने केलेल्या दाव्यांवर कुणीही विश्वास ठेवायला तयार नाही. अशात आता प्रश्न हादेखील निर्माण होतो आहे की ज्या चीनमध्ये कोरोना व्हायरस आढळून आला तो चीन सहा ते आठ महिन्यात पुन्हा एकदा रूळावर कसा काय आला? कारण भारतासह जगातले अनेक देश मागील दीड वर्षापासून कोरोनासोबत संघर्ष करत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात हाहाकार माजवला आहे. अशात आता अमेरिकेने केलेला एक दावा हा चीनवरचा संशय गहिरा करणारा आहे.

हे वाचलं का?

अमेरिकेने समोर आणलेला हा अहवाल 2015 च्या घटनाक्रमाशी संलग्न आहे. जगभरातले लोक त्यावेळी व्हायरसचे काय घातक परिणाम होऊ शकतात यापासून अनभिज्ञ होते. मात्र त्याचवेळी चीन कोरोना व्हायरसचा एक बायो वेपन म्हणून उपयोग करण्याची तयारी करत होतं. एवढंच नाही तर चीन सैन्यात कार्यरत असलेल्या काही संशोधकांनी जैविक शस्त्र अर्थात बायो वेपन हे वापरून तिसरं महायुद्ध लढल जाऊ शकतं असंही म्हटल्याचं या अहवालात नमूद आहे.

‘कोरोना व्हायरस आपल्या सहनशीलतेची परीक्षा पाहतोय एकत्र लढूयात’, ‘मन की बात’मधून मोदींचं जनतेला आवाहन

अमेरिकेच्या परराराष्ट्र खात्याने मिळवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे एक अहवाल तयार केला आहे. या अहवालात हे दावे करण्यात आले आहेत. ब्रिटनच्या ‘द सन’ या वृत्तपत्राचा आणि ऑस्ट्रेलियाचा ‘द ऑस्ट्रेलियन’ यांचाही हवाला अमेरिकेच्या अहवालात करण्यात आला आहे.

काय म्हटलं आहे अमेरिकेच्या अहवालात?

अमेरिकेला मिळालेल्या कथित दस्तावेजात 2015 मध्ये चीनच्या सैन्यदलातील संशोधक आणि चीनचे आरोग्य अधिकारी हे कोव्हिड 19 अर्थात कोरोना व्हायरसवर संशोधन करत होते. सार्स कोरोना व्हायरसची चर्चा जेनेटिक वेपनचं नव युग या विषयान्वये करण्यात आली आहे. कोरोना हे त्यातलंच एक ठळक उदाहरण आहे. अमेरिकेच्या अहवालात हा देखील उल्लेख आहे की चीनने शत्रू देशांच्या देशातील आरोग्य यंत्रणा उद्ध्वस्त करण्याबद्दल चर्चा केली आहे.

कोरोना विषाणूसंदर्भातील समज आणि त्यामागील सत्यता

या कथित अहवालात हा उल्लेखही आहे की व्हायरसचं कृत्रीम रूप बदलता येईल. असं केल्याने हा व्हायरस जगभरातल्या लोकांमध्ये आजार पसरेल. या दस्तावेजांमध्ये चीनच्या उच्चपदस्थ आरोग्य अधिकाऱ्यांचेही लेख आहेत. कोरोना व्हायरसचं पहिलं प्रकरण 2019 मध्ये समोर आलं होतं. त्यामुळेच या व्हायरसला कोव्हिड 19 म्हटलं जातं. चीनमधलं वुहान हे शहर व्हायरसचं केंद्र होतं. या व्हायरसबाबत चीनची पारदर्शकता ही कायमच संशयाच्या घेऱ्यात आहे. अशात आता अमेरिकेने चीनचे गुप्त दस्तावेज समोर आल्याचं म्हटलं असून 2015 पासूनच चीन या व्हायरसची निर्मिती करत असल्याचा दावा केला आहे.

    follow whatsapp