Taliye landslide: दु:खाचा डोंगर कोसळलेल्या तळीये गावाला CM Thackeray देणार भेट, घटनास्थळाचा घेणार आढावा

मुस्तफा शेख

• 07:06 AM • 24 Jul 2021

मुंबई: महाड तालुक्यातील तळीये गावात शुक्रवारी दरड कोसळून एक मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत तब्बल 40 हून अधिक नागरिक ठार झाल्याचं समोर आलं आहे. या दुर्घटनेमुळे तळीये गावातील संपूर्ण वाडीच नष्ट झाली आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, आता याच दुर्घटना झालेल्या तळीये गावी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: महाड तालुक्यातील तळीये गावात शुक्रवारी दरड कोसळून एक मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत तब्बल 40 हून अधिक नागरिक ठार झाल्याचं समोर आलं आहे. या दुर्घटनेमुळे तळीये गावातील संपूर्ण वाडीच नष्ट झाली आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, आता याच दुर्घटना झालेल्या तळीये गावी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भेट देणार असल्याची माहिती समजते आहे.

हे वाचलं का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 24 जुलै रोजी दुपारी मुंबईतून महाडच्या दिशेने रवाना होणार आहेत. यावेळी ते हेलिकॉप्टरने रायगड जिल्ह्यातील पूर स्थितीची आढावा घेणार आहेत. यानंतर मुख्यमंत्री महाडमधील तळीये या गावी जाणार असून दरड कोसळलेल्या ठिकाणी जाऊन एकूण परिस्थिती जाणून घेणार आहेत.

तळीये गावी दुर्घटना झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे पोहचले होते. दरम्यान, या घटनेनंतर त्यांनी राज्य सरकारवर बरीच टीका केली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता स्वत: मुख्यमंत्री घटनास्थळाची पाहणी करणार आहेत.

दरम्यान, याआधीच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केलेली आहे. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोक संदेशात व्यक्त केली होती.

नेमकी दुर्घटना घडली कशी?

रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली होती. महाडमधील तळीये गावातील डोंगराजवळील एका वाडीवर अचानक दरड कोसळली होती. ज्यामध्ये तब्बल 30 हून अधिक घरं दबली गेली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत 40 हून अधिक लोकांचे मृतदेह हाती आले आहेत.

मात्र, अद्यापही अशी भीती व्यक्त केली जात आहे की, तळीये गावातील या दुर्घटनेत अद्याप 50 हून अधिक जण बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, काही वर्षांपूर्वीच अशीच घटना पुणे जिल्ह्यातील माळीण गावात घडली होती. ज्यामध्ये अख्खं गावच्या गावच नाहिसं झालं होतं. असाच प्रकार आता महाडच्या तळीये गावात घडली आहे.

Mahad Taliye Landslide: तळये दरड दुर्घटनेतील 36 मृतदेह आतापर्यंत हाती

महाडमधील बिरवाडीपासून 14 किमीपासून तळीये गावाजवळ गुरुवारी संध्याकाळी 5 ते 6 वाजेच्या सुमारास अचानक दरड कोसळली होती. दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने डोंगरचा बराचसा भाग अचानक कोसळला. ज्याच्या खाली अवघी वाडीच दबली गेली. यावेळी इथे फक्त ढिगारे दिसत होते.

    follow whatsapp