मुंबई: ‘कधी मराठीचा खेळ, कधी हिंदुत्वाचा खेळ.. आम्ही मराठी.. मग बाकिच्यांना हाकूलन द्यायचं. मग ते फसलं तर आम्ही हिंदू.. मग बाकिच्यांना घरात बोलवायचं. हेच जे चाळे चालतात ना त्यांना माकडचाळे म्हणतात.’ असा घणाघाती टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thacekreay) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thacekreay) यांचं नाव न घेता लगावला आहे.
ADVERTISEMENT
‘लोकसत्ता’ला या वृत्तपत्राला सोशल मीडिया लाइव्हद्वारे मुख्यमंत्र्यांनी जी मुलाखत दिली त्यात ते मनसेवर हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्द्यावरुन अक्षरश: कडाडले आहेत. काही जण ठरविक मुद्दे हाती घेतात आणि ते फसले की सोडून देतात असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर कशी टीका केली?
‘मी अशा खेळाडूंकडे लक्ष देत नाही. हे खेळाडू कोणत्या मैदानात कोणते-कोणते खेळ करतात हे आतापर्यंत लोकांनी अनुभवलेलं आहे. कधी मराठीचा खेळ, कधी हिंदुत्वाचा खेळ.. तर असे हे जे खेळाडू असतात ना.. मी इतरांचा काही अपमान करु इच्छित नाही म्हणजे जे खेळ करतात डोंबारी वैगरे.. त्यांचा अपमान करु इच्छित नाही. परंतु असे खेळ महाराष्ट्राची जनता पाहत आली आहे.’
‘काय झालंय 2000 चा कालखंड मोठा आहे. या काळत नाटक, थिएटर, सिनेमा हे सगळं बंद होतं. अशावेळी जर करमणूक फुकट मिळत असेल तर का नाही पाहायची.’
‘शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे. हे मी काही लपवून ठेवलेलं नाही. मी विधानसभेत हे बोललो आहे. आता त्यांना ज्यांना नवीन-नवीन हे करुन बघू, ते करुन बघू. बरेचदा असं होतं की, मार्केटिंगचा जमाना आहे. मार्केटमध्ये तुम्हाला नाही पसंत पडलं तर परत करा. तसं हे तुम्हाला फळलं तर फळलं नाही तर परत.. हे असे भोंगेधारी-पुंगीधारी खूप पाहिलेत.’
‘आम्ही मराठी.. मग बाकिच्यांना हाकूलन द्यायचं. मग ते फसलं तर आम्ही हिंदू.. मग बाकिच्यांना घरात बोलवायचं. हेच जे चाळे चालतात ना त्यांना माकडचाळे म्हणतात. हे दावेदार वैगरे शब्द सोडा पण आपला हिंदू आणि आपल्या देशातील आणि विशेषत: महाराष्ट्रातील जनता ही एवढी नासमज नाहीए.’
‘शिवसेनाप्रमुखांना सांगितलं होतं की, हिंदुत्व हा आमचा श्वास आहे. त्यामुळे आम्हाला सारखा हिंदुत्वाचा डंका वाजवावा लागत नाही. आम्ही हिंदू आहोत.. हिंदू आहोत असं का तुम्हाला सारखं सांगावं लागत आहे? का तुम्हाला रोज नवनवीन ओळख आणि झेंडे फडकवावे लागत आहेत. कधी या रंगाचा झेंडा, कधी त्या रंगाचा.. असं का दरवेळेस करावा लागतोय? आम्ही कधीच झेंडा बदलेला नाहीए.’
‘मला खोटं बोलायचं नाही.. प्रामाणिकपणे सांगतो’, भाजप-NCP-सेनेच्या युतीवर CM ठाकरेंचं मोठं विधान
‘खरं तर तुमच्याशी बोलण्याच्या ओघात मला माझ्या 14 तारखेच्या सभेसाठी सुचत आहेत. त्या आता काही मी कदाचित बोलणार नाही. पण हे जे जन्मापासूने नवनवीन झेंडेधारी आहेत ना त्यांची ओळख.. काही जणांचा प्रवास पाहिला तर त्यांचे मशिदीतून बाहेर पडतानाचे फोटो आहेत, काही मराठी माणासांसोबतचे कधी हिंदूंचे कधी काय तर कधी काय..’ अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या मुद्द्यावरील सुरु असलेल्या राजकारणाचा समाचार घेतला आहे.
उद्धव ठाकरेंच्या टीकेला औरंगाबाद सभेत राज ठाकरे काय उत्तर देणार?
दुसरीकडे राज ठाकरे हे आज (1 मे) औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. या सभेला अवघे काही तास उरले आहेत. अशावेळी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला राज ठाकरे नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT