मुंबई: महाराष्ट्राचे (Maharashtra) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी रविवारी सोशल मीडिया लाइव्हच्या माध्यमातून जनतेला संबोधित करताना लोकल सेवा सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला होता. यासोबतच राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल आणि प्रार्थनास्थळे सुरु करण्याबाबत देखील लवकरच निर्णय घेण्यात होईल असं स्पष्ट केलं होतं. याचसाठी त्यांनी सोमवारी टास्क फोर्सची (Task Force) बैठकही घेतली.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत संभाव्य तिसरी लाट, (Third Wave) ऑक्सिजनची लागणारी गरज, लसीकरणाचा वेग वाढवणे, ट्रेसिंग, ट्रॅकिंग वाढवणे, तसेच येणाऱ्या काळात आणखीही काही क्षेत्रांच्या बाबतीत सावधानता बाळगून कशा प्रकारे निर्बंधात शिथिलता आणायची यावर चर्चा झाली असल्याची माहिती समजते आहे. आजच्या बैठकीतील सूचनांच्या अनुषंगाने टास्क फोर्स आता नवी नियमावली तयार करीत आहे.
टास्क फोर्सच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर तज्ज्ञांशी चर्चा केली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, डॉक्टर संजय ओक, डॉक्टर शशांक जोशी, मेहुल मेहता, डॉक्टर झहीर विराणी, डॉक्टर राहुल पंडित, वसंत नागवेकर, डॉक्टर सुहास प्रभू, डॉक्टर अजित देसाई, ओम श्रीवास्तव, डॉक्टर उदवाडिया,अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास, यांची उपस्थिती होती
अॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
गेल्या 24 तासांत देशात 35,499 नवे रुग्ण समोर आले आहेत. तर 39,686 जण बरे झाले आहेत. देशात सध्या 4,02,188 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, पाच राज्यांतून 83.72% नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. ज्यामध्ये एकट्या केरळमध्ये 52.42% रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत केरळमध्ये सर्वाधिक 18,607 रुग्ण सापडले आहेत. तर महाराष्ट्रात 5508 रुग्ण आढळून आले आहेत.
Mumbai Local Train: मुंबई लोकलचा पास कसा मिळवाल?, पाहा रेल्वे प्रवासासाठी नेमके नियम काय
देशात सध्या केरळमध्ये सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. येथे 1.76 लाख अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर महाराष्ट्र या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे 68 हजारांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाची 63.57 लाख रुग्ण समोर आले आहेत. ज्यापैकी 61.51 लाख लोक बरे झाले आहेत. तर 1.34 लाख लोकांनी आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील कोणत्याही राज्यापेक्षा हे प्रमाण सर्वाधिक आहे.
ADVERTISEMENT