औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शस्रक्रियेनंतर पहिल्यांदाच मुंबईबाहेर जात आहेत. शिवसेनेनं औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर सभा आयोजित केली आहे. औरंगाबादेतील शिवसेनेची पहिली शाखा गुलमंडीवर स्थापन झाली. याच शाखेच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त ही सभा आयोजित करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
काही दिवसांपूर्वी याच मैदानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा झाली. तसंच देवेंद्र फडणवीस यांनी जनआक्रोश मोर्चा काढून शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. तसेच यावेळी औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा मुद्दाही चव्हाट्यावर आला आहे. राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीच्या धामधुमीत एमआयएमच्या दोन मतांनाही मोठं महत्त्व प्राप्त झालं. त्यामुळे या सगळ्या बाबी लक्षात घेता आज (8 जून) उद्धव ठाकरे काय बोलतात आणि शिवसैनिकांना याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.
ADVERTISEMENT