मुख्यमंत्री उद्या Lockdown ची घोषणा करणार, दहावीची परीक्षा रद्द-राजेश टोपे

मुंबई तक

• 12:55 PM • 20 Apr 2021

महाराष्ट्रात कठोर लॉकडाऊन लागणार आहे लॉकडाऊनची घोषणा उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील. लॉकडाऊनबद्दल नव्या गाईडलाईन्सही जाहीर होणार आहेत. दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत अशीही माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. लॉकडाऊन किती दिवसांचा असेल, काय गाईडलाईन्स असतील ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या स्पष्ट करणार आहेत असंही राजेश […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात कठोर लॉकडाऊन लागणार आहे लॉकडाऊनची घोषणा उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील. लॉकडाऊनबद्दल नव्या गाईडलाईन्सही जाहीर होणार आहेत. दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत अशीही माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. लॉकडाऊन किती दिवसांचा असेल, काय गाईडलाईन्स असतील ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या स्पष्ट करणार आहेत असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

महाराष्ट्रातल्या कोरोना रुग्णांच्या सॅम्पलमध्ये आढळलं डबल म्युटेशन – राजेश टोपे

राज्य मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच संपली आहे. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात Break The Chain चे निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र तरीही निर्बंध पाळले जात नाहीत. लोकांनी शिस्त पाळणं अपेक्षित आहे ते होत नसल्याने मंत्रिमंडळ बैठकीत अनेक मंत्र्यांनी लॉकडाऊन लावा अशीच सूचना केली. त्यानुसार आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करणार आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. मंत्रिमंडळाच्या बैठकीत दहावीची परीक्षा रद्द करण्याबद्दलही निर्णय झाला आहे. दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली असून वर्षभरातील अभ्यास आणि घेण्यात आलेल्या परीक्षा या निकषांवर गुण दिले जातील असंही टोपे यांनी सांगितलं.

LockDown New Rules : किराणा दुकानं, डेअरी, फळं, भाजीपाला विक्री सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरू राहणार

लॉकडाऊन हा अत्यंत कठोर असला पाहिजे असंच मत आजच्या बैठकीत सगळ्यांनी मांडलं असंही राजेश टोपे यांनी सांगितलं. गेल्या वर्षी जसा कठोर लॉकडाऊन लागू करण्यात आला होता तसाच हा लॉकडाऊन हवा जेणेकरून रूग्णसंख्या आटोक्यात आणता येईल. सध्या महाराष्ट्राची रूग्णसंख्या झपाट्याने वाढते आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुधवारी कठोर लॉकडाऊन त्याबद्दलच्या सूचना जाहीर करतील. लॉकडाऊन लावण्याशिवाय राज्यात पर्याय उरलेला नाही असं सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनीही सांगितलं.

अस्लम शेख काय म्हणाले?

मुंबईचे पालकमंत्री यांनीही राज्यात लॉकाडाऊन लावण्याची नितांत गरज आहे ही बाब स्पष्ट केली. सध्या राज्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात येत नाहीये. ऑक्सिजनचा तुटवडा भासतो आहे, बेड्स कमी पडत आहेत. त्यामुळे ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनशिवाय पर्याय उरलेला नाही.

    follow whatsapp