कॉमेडियन राजू श्रीवास्तवची प्रकृती गंभीर झाली आहे. त्याला व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. बुधवारी राजू श्रीवास्तवला हार्ट अटॅक आल्याने दिल्लीतल्या एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कॉमेडियन राजू श्रीवास्तवला बुधवारी हॉटेलच्या जिममध्ये वर्क आऊट करत असताना चक्कर आली. त्यानंतर तो खाली कोसळला. त्याला हार्ट अटॅक आल्याची माहिती त्याच्या पीआरओ आणि भावाने दिली होती.
ADVERTISEMENT
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजू श्रीवास्तवला मदतीचं दिलं आश्वासन
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कॉमेडियन राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीबाबत त्यांच्या पत्नीकडून माहिती घेतली. तुमच्या कुटुंबावर आत्ता संकाचा प्रसंग आहे. या परिस्थितीत तुम्हाला जी मदत लागेल ती करायला आम्ही तयार आहोत असं आश्वासन योगी आदित्यनाथ यांनी राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबाला दिलं आहे.
राजू श्रीवास्तवची प्रकृती कशी आहे?
राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार एम्स रूग्णालयात त्याला व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. सुरूवातीला राजू श्रीवास्तवला इमर्जन्सी मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला सीसीयू म्हणजेच Cardiac Care Unit मध्ये शिफ्ट करण्यात आलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार राजू श्रीवास्तवची अँजिओग्राफी करण्यात आली आहे. यामध्ये हृदयात एक मोठा ब्लॉक शंभर टक्के आढळला आहे. डॉक्टरांचं म्हणणं आहे की त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला व्हेंटिलेटर सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आलं आहे.
कॉमेडियन राजू श्रीवास्तवच्या बाबत समोर आलेल्या बातमीमुळे त्यांचे फॅन्स नाराज झाले आहेत. लवकरच त्यांना आराम मिळावा यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत. राजू श्रीवास्तव हे प्रसिद्ध कॉमेडियन आहेत तसंच उत्तर प्रदेश फिल्म विकास परिषदेचे ते चेअरमनही आहेत.
राजू श्रीवास्तव हे त्यांच्या खास प्रकारच्या अनोख्या कॉमेडी शोजसाठी ओळखले जातात. राजू श्रीवास्तवला लहानपणापासूनच कॉमेडियन व्हायचं होतं. राजूने काही सिनेमांमध्येही भूमिका केल्या आहेत. राजूने त्याचं करिअर स्टेज शोच्या माध्यमातूनच सुरू केलं होतं.
राजू श्रीवास्तवला हार्ट अटॅक आल्याची बातमी समोर आली तेव्हा चाहते खूपच चिंतित झाले. राजू श्रीवास्तव यांचा एक खास प्रेक्षक वर्ग आहे. उत्तम कॉमेडी टायमिंगसाठी राजू ओळखला जातो. राजू श्रीवास्तवने अनेक स्टेज शो केले आहेत. तसंच त्याच्या कॅसेट्स आणि सीडीजही प्रसिद्ध आहेत.
ADVERTISEMENT