एकनाथ शिंदे यांच्याबाबत जे काही वृत्त माध्यमातून दाखवण्यात आलं हा प्रकार म्हणजे कॉमेडी एक्स्प्रेस सिझन २ आहे. कॉमेडी एक्स्प्रेस सिझन १ विधीमंडळात झालेला आहे. फुटीर गटाच्या भवितव्याचा निर्णय २० तारखेला लागेल. ज्या १६ आमदारांबाबत आम्ही जी याचिका दाखल केली आहे त्यावर आम्हाला न्याय मिळेल असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. फुटीर गट बाळासाहेब ठाकरे यांच्या ५६ वर्षांची कार्यकारिणी बरखास्त कशी करतो? स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आणि आमदार वाचवण्यासाठी ही धडपड सुरू आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
संजय राऊत म्हणाले शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बाळासाहेब ठाकरेंनी तयार केलेली आहे
शिवसेनेचं नेतेमंडळ आणि राष्ट्रीय कार्यकारिणी बाळासाहेब ठाकरेंनी तयार केली आहे. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे. फुटीरतावाद्यांना आमची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा काहीही अधिकार नाही. जे निघून गेले त्यांच्याशिवाय शिवसेना ठामपणे उभी केले आहे. लोकसभेत जर असा कुणी प्रयत्न केला तर इथेही ते फुटीरच ठरतील. या क्षणी आम्ही असं मानतो की लोकसभेतली शिवसेना एकसंध आहे. माझ्या बाजूला लोकसभेला गटनेते बसले आहेत. लोकांमध्ये उगाच भ्रम निर्माण केला जातो असाही आरोप संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. मुख्यमंत्री दिल्लीत येतील ते त्यांची खुर्ची वाचवण्यासाठी होते. कार्यकारिणीसाठी १४ खासदार होते हे वृत्तही निखालस खोटं आहेत. जे काही आकडे दिले जात आहेत ती सगळी फसवाफसवी आहे. कॉमेडी एक्सप्रेस सिझन वन मुंबईत झाला, आता दिल्लीत दुसरा सिझन सुरू आहे त्याची लोक मजा घेत आहे. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिशिवसेना स्थापन करत थेट उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिलं आहे. त्यानंतर पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT