दहिसरमध्ये अग्निशमन दलाच्या भरतीत गोंधळ, उमेदवार मुलींचा आक्रमक पवित्रा

मुंबई तक

• 07:19 AM • 04 Feb 2023

Mumbai fire brigade recruitment : मुंबईच्या दहिसरमध्ये अग्निशमन दलाच्या भरतीत (fire brigade recruitment ) गोंधळ झाल्याचं पाहायला मिळत आहे. शनिवारी अग्निशमन दलासाठी 900 जागांची भरतीप्रक्रिया (Recruitment Process for 900 Posts for Force) पार पडत आहे. मात्र यादरम्यान उमेदवार मुलींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यांच्यासोबत अन्याय होत असल्याचा दावा महिला उमेदवार करत आहेत. पात्रतेच्या निकषात बसून […]

Mumbaitak
follow google news

Mumbai fire brigade recruitment : मुंबईच्या दहिसरमध्ये अग्निशमन दलाच्या भरतीत (fire brigade recruitment ) गोंधळ झाल्याचं पाहायला मिळत आहे. शनिवारी अग्निशमन दलासाठी 900 जागांची भरतीप्रक्रिया (Recruitment Process for 900 Posts for Force) पार पडत आहे. मात्र यादरम्यान उमेदवार मुलींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यांच्यासोबत अन्याय होत असल्याचा दावा महिला उमेदवार करत आहेत. पात्रतेच्या निकषात बसून सुद्धा चुकिच्या पद्धतीने बाहेर काढलं जात आहे, असं या मुलींचं म्हणणं आहे. त्यामुळे या ठिकाणी मुलींनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. म्हणून भरतीच्या ठिकाणी गोंधळ पाहायला मिळत आहे. Confusion in fire brigade recruitment in Dahisar

हे वाचलं का?

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात महिला दांडके घेऊन का आल्या?

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईतील अग्निशमन दलात 900 जागांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. दहिसर येथे भरतीसाठीचं सेंटर उभं करण्यात आलं आहे. सकाळपासून याठिकाणी भरतीसाठी उमेदवारांची गर्दी पाहायला मिळत आहे. यादरम्यान मुलींसाठी 162 सेमी उंचीची अट आहे. मात्र 162 सेंमी उंची जास्त असलेल्या मुलींना सुद्धा बाहेर काढण्यात आलं, त्यामुळे उमेदवार मुली नाराज झालेल्या आहेत. आणि त्यांनी आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

आमची उंची 162 सेंमी पेक्षा जास्त असताना सुद्धा आम्हाला बाजूला केलं आहे. मात्र आमच्यापेक्षा कमी उंचीच्या मुलींना पात्र ठरवलं आहे, असं उमेदवार मुलींचं म्हणणं आहे. भरती प्रक्रियेतून बाहेर काढल्याने अनेक मुलींना रडू कोसळलं. ज्या मुलींना पात्र ठरवलंय त्यांना बाहेर आणून आमच्या उंचीची तुलना करुन पहा, जर आमची आणि त्यांची उंची समान नसेल तर ते म्हणतील तसं आम्ही बाहेर बसायला तयार आहे, असं मुलींचं म्हणणं आहे. अन्यथा या भरतीवर स्थगिती आणली पाहिजे, असं देखील त्यांचं म्हणणं आहे.

उशिरा आलेल्या मुलांना टोकण देऊन दुसऱ्या दिवशी बोलावलं जात आहे परंतू दिलेल्या वेळेवर पोहोचून सुद्धा आम्हाला आत प्रवेश दिला नाही. घानेरड्या राजकारणाचा बळी आम्हाला ठरवलं जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे संतप्त मुलींना आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे दहिसर येथे गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे. आता यातून काही मार्ग काढला जातो की, या मुलींना अपात्र ठरवलं जातं, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp