मुंबई : छत्तीसगड, रायपूरमध्ये या महिन्यात काँग्रेसचे (Congress) ३ दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. २४ ते २६ फेब्रुवारी २०२३ या कालावधी होणाऱ्या या पूर्ण अधिवेशनात ९ राज्यांच्या निवडणुका आणि मिशन २०२४ च्या रणनीतीवर चर्चा होणार आहे. दरम्यान, या अधिवेशनासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी मसुदा समिती आणि विविध उपसमूहांची स्थापना केली आहे. (Congress President Mallikarjun Kharge has constituted the Drafting Committee and various Subgroups, for the 85th Plenary Session of the Indian National Congress)
ADVERTISEMENT
बाळासाहेब थोरातांचं नाव वगळलं :
यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुकुल वासनिक, यशोमती ठाकूर, नितीन राऊत, मिलिंद देवरा अशा बड्या नेत्यांचा समावेश आहे. पण यातील एकाही समिती किंवा उपसमूहामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा समावेश केलेला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. केवळ वक्त्यांच्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. मात्र नाना पटोले यांच्याविरोधात राष्ट्रीय पातळीवर रोष व्यक्त केल्यानं त्यांचं नाव वगळलं आहे की तब्येतीच्या कारणामुळे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
Exclusive: तांबे, पटोले की थोरात… अशोक चव्हाणांनी नेमकं कोणाला सुनावलं?
-
मसुदा समितीचे सदस्य
-
अशोक चव्हाण, सदस्य
-
मुकुल वासनिक, सदस्य
-
पृथ्वीराज चव्हाण, सदस्य
-
राजकीय व्यवहार उपगट
-
अशोक चव्हाण, निमंत्रक
-
आरिफ नसीम खान, सदस्य
-
यशोमती ठाकूर, सदस्या
-
आर्थिक घडामोडी उपसमूह
-
मिलिंद देवरा, सदस्य
-
प्रणिती शिंदे, सदस्या
-
नितीन राऊत, सदस्य
बाळासाहेब थोरात दिल्लीत दाखल; विधानसभा अध्यक्षपदासाठी ‘ही’ चार नावं स्पर्धेत
-
शेतकरी आणि कृषी उपसमूह
-
नाना पटोले, सदस्य
-
सामाजिक न्याय व अधिकार उपसमूह
-
मुकुल वासनिक, अध्यक्ष
-
शिवाजीराव मोघे – सदस्य
-
विजय वडेट्टीवार – सदस्य
-
युवा, शिक्षण आणि रोजगार उपसमूह
-
वर्षा एकनाथ गायकवाड, सदस्य
नाना पटोले – थोरात वाद :
राज्यात विधान परिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये फारच उलथापाल झाली आहे. सत्यजीत तांबे अपक्ष निवडून आल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोलेंविरोधात नाराजी व्यक्त करत थेट काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा काँग्रेस हायकमांडकडे देऊ केला. तसंच पत्र लिहून नाना पटोले यांच्यासोबत काम करणं अशक्य असल्याचं स्पष्ट केलं. यामुळे काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे.
ADVERTISEMENT