गोवा राज्याची विधानसभा निवडणूक पुढच्या महिन्यात होणार आहे. अशात काँग्रेस पक्षाने केलेली एक अनोखी कृती सध्या गोव्यात चर्चेचा विषय ठरली आहे. शनिवारी काँग्रेसच्या उमेदवारांना मंदिर, मशिद आणि चर्चमध्ये शपथ घेण्यास सांगण्यात आलं. ही शपथ अशी होती की निवडणूक जिंकल्यानंतरही आमच्यापैकी कुणीही पक्ष सोडणार नाही. 2017 पासून आजपर्यंत 15 आमदारांनी पक्ष सोडला आणि ते भाजपमध्ये गेले आहेत.
ADVERTISEMENT
आता 2022 ची गोवा निवडणूक भाजपसोबत काँग्रेसनेही प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळेच शनिवारी हा अनोखा शपथ सोहळा मंदिर, मशिद आणि चर्चमध्ये पार पडला. 36 जणांनी काँग्रेस पक्ष न सोडण्याची शपथ घेतली आहे. महालक्ष्मी मंदिर, बम्बोलिम क्रॉस आणि बेटिन मशिद या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला.
गोवा निवडणुकीसाठी भाजपची 34 उमेदवारांची यादी, उत्पल पर्रिकरांचा पत्ता कट
वरिष्ठ काँग्रेस नेते दिगंबर कामत यांनी सांगितलं की जनतेच्या मनात काही शंका आहेत त्या दूर करण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतो आहोत. काँग्रेसला गोव्यात पुन्हा निवडणून यायचं आहे. जनहित पाहणं हाच आमचा मुख्य उद्देश आहे. काही राजकीय पक्षातले लोक ही चर्चा करत आहेत की काँग्रेसे आमदार गोव्यात निवडून आले तरीही काही उपयोग नाही कारण ते दुसऱ्या पक्षात जातील. अशी चर्चा करणारे नेते तेच आहेत जे आमच्या विधेयकांना पळवत आहेत. जर एखाद्या मुलाने त्याच्या आई वडिलांना सोडून दिलं तर आई आणि वडील दोघंही त्यासाठी जबाबदार असतात. त्यामुळे आमचा पक्ष कुणी सोडला तर त्याला आपल्या पक्षात घेणारेही दोषी आहेतच असं म्हणत त्यांनी भाजपलाही टोला लगावला आहे.
गोवा भाजपचे आमदार सेक्स स्कँडलमध्ये अडकल्याने पक्ष सोडत आहेत, दिनेश गुंडूराव यांचा आरोप
आम्ही शपथ देण्याचा कार्यक्रम अशासाठी घेतला की लोकांमध्ये ही धारणा तयार होत होती की काँग्रेसला मत देणं हे भाजपला मत दिल्यासारखंच आहे. ही धारणा आम्हाला मोडून काढायची होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी हे वक्तव्य केलं होतं की काँग्रेसला गोव्यात मत देणं हे भाजपला मत देण्यासारखं आहे कारण निवडून आल्यानंतर काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये जातात. या वक्तव्याचं उत्तरही कामत यांनी दिलं आहे.
महालक्ष्मी देवस्थानचे पुजारी यांनी सगळ्यांना शपथ घ्यायला लावली की महालक्ष्मी माते, तुझ्या चरणी आम्ही श्रीफळ ठेवून ही प्रतिज्ञा करतो आहोत की काँग्रेस पक्षाने आम्हाला उमेदवारी दिली आहे. आम्ही निवडून आल्यानंतर हेवटेन तेवटेन जाता म्हणजेच पक्षांतर न करता काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहू. पक्षात राहून पक्षाचा विकास होईल असे काम करू. सध्या काँग्रेसच्या उमेदवारांनी घेतलेली ही आगळीवेगळी शपथ हा गोव्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
ADVERTISEMENT