शिवसेनेतील बंड आणि सत्तांतरामुळे क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेसमधील आमदारांचा विषय मागे पडला होता. मात्र, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मागणीची गंभीर दखल घेत काँग्रेस पक्षश्रेष्ठीने कारवाईच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलं आहे. काँग्रेसने ११ आमदारांना कारणे द्या नोटीस बजावली आहे.
ADVERTISEMENT
जूनमध्ये पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत अपेक्षित असताना काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांमध्ये लढत झाली. यात काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे हे पराभूत झाले. निवडणूक निकालानंतर काँग्रेसची ७ मतं फुटल्याचं समोर आलं. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमधील काही नेत्यांनी यावर चिंता व्यक्त केली होती.
“उद्धव ठाकरेंनी हे आधीच सांगितलं असतं, तर बाहेरून पाठिंबा देण्याची आमची तयारी होती”
दरम्यान, शिवसेनेत बंडखोरी झाल्याने काँग्रेसच्या आमदारांनी केलेल्या क्रॉस व्होटिंगचा मुद्दा चर्चेच्या परिघातून बाहेर पडला होता. मात्र, सत्तांतर झाल्यानंतर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील यांचं या मुद्द्याकडे लक्ष वेधलं. क्रॉस व्होटिंग करणाऱ्या ७ आमदारांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर विश्वासदर्शक ठरावावेळी गैरहजर असणाऱ्या आमदारांबद्दलही नाराजी व्यक्त केली होती.
विधान परिषद निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावावेळी घडलेल्या दोन्ही प्रकाराची काँग्रेस पक्षश्रेष्ठीने गंभीर दखल घेतली आहे. काँग्रेसने ११ आमदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.
‘दिल्लीश्वरांनी फडणवीसांचा काटा काढला’, काँग्रेस प्रवक्त्यांचं खळबळजनक वक्तव्य
नाना पटोले दिल्लीत
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला. महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसची ४४ मतंही काँग्रेसच्या बाजूनं पडली नाही. महत्त्वाच्या निवडणुकीत काँग्रेसची ७ मतं फुटली, त्यामुळे क्रॉस व्होटिंग करणारे सात आमदार कोण अशी चर्चा सुरूये.
विधान परिषद निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर प्रथम प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्ली दौऱ्यावर आहेत. नाना पटोले हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी, पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह के.सी. वेणुगोपाल हे उपस्थित असणार आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांचं म्हणणं काय?
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी क्रॉस व्होटिंगच्या प्रकारावर नाराजी व्यक्त केलीये. विधान परिषद निवडणुकीत फुटलेले आमदार कोण याची चौकशी झाली पाहिजे. कारण ही बाब गंभीर असून, याची दखल घेतली गेली पाहिजे. विश्वासदर्शक ठरावावेळीही काँग्रेसचे आमदार उशिरा पोहोचले. ही बाबही चांगली नसल्याचं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलेलं आहे. काँग्रेसने ११ आमदारांना नोटीस बजावल्या असून, आता पुढे काँग्रेस पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार हे आगामी काही काळात दिसेल.
ADVERTISEMENT