पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार होणार? : G-23 चे नेते आझादांच्या भेटीला

मुंबई तक

• 02:39 PM • 30 Aug 2022

दिल्ली : काँग्रेसची अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर पक्षांतर्गत राजकारणाला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह G-23 मधील वरिष्ठ नेते आनंद शर्मा आणि भुपेंदरसिंह हुड्डा यांनी आज काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांची भेट घेतली. या भेटीनंतर पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार असणार चर्चांना सुरुवात झाली […]

Mumbaitak
follow google news

दिल्ली : काँग्रेसची अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर पक्षांतर्गत राजकारणाला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह G-23 मधील वरिष्ठ नेते आनंद शर्मा आणि भुपेंदरसिंह हुड्डा यांनी आज काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांची भेट घेतली. या भेटीनंतर पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार असणार चर्चांना सुरुवात झाली आहे.

हे वाचलं का?

मात्र आपण अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार नसल्याचे चव्हाण यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना स्पष्ट केले आहे. चव्हाण म्हणाले, आज आम्ही सर्वांनी गुलाम नबी आझाद यांची भेट घेतली. या भेटीत लपविण्यासारखं काहीही नव्हतं. सर्वांसमोर अगदी उजेडात ही भेट झाली आहे. आम्ही सर्वांनी मागील अनेक वर्षांपासून आजाद यांच्यासोबत एकत्र काम केले होते, त्यामुळे आम्ही भेटण्यासाठी आलो होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अध्यक्षपदाच्या उमेदवारीवर बोलताना चव्हाण म्हणाले, मी अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार नाही. मी उमेदवार असणार नाही. मात्र जवळपास अनेक वर्षांनंतर अध्यक्षपदाची निवडणूक होत असल्याचा आनंद आहे. उमेदवार कोण असणार, निवडणुकीबाबत रणनीती काय असणार या सगळ्यावर येत्या काळात चर्चा होणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

गुलाम नबी आझादांचा काँग्रेसला झटका, 1-2 नाहीतर 51 नेते देणार पदाचा राजीनामा

दिवाळीपूर्वी काँग्रेसला मिळणार नवीन अध्यक्ष :

काँग्रेस अध्यक्षपदासाठी नुकतीच निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. येत्या 22 सप्टेंबर रोजी या निवडणुकीची अधिसुचना निघणार आहे. या कार्यक्रमानुसार 24 ते 30 सप्टेंबरदरम्यान अर्ज दाखल करता येणार आहेत. तर मतदान आणि मतमोजणीची वेळ आल्यास 17 ऑक्टोबरला मतदान होणार असून 19 ऑक्टोबरला मतमोजणी पार पडणार आहे.

दिवाळीपूर्वी काँग्रेसला मिळणार नवीन अध्यक्ष : पहिलाच पेपर मोदी-शहांच्या गुजरातचा

2019 च्या लोकसभा निवडणुकीतील मानहानीरकारक पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांच्याकडे हंगामी अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली होती. त्यानंतर पक्षामधून सातत्याने अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची मागणी करण्यात येत होती. गतवर्षी ऑक्टोंबर महिन्यात पक्षाच्या नव्या अध्यक्षांची निवड 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर या एका महिन्याच्या कालावधीत करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती.

    follow whatsapp