काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही सौम्य लक्षणं त्यांना जाणवत होती ज्यानंतर त्यांनी कोरोनाची चाचणी केली. ज्यामध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. जे कुणीही माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी तातडीने कोरोना चाचणी करून घ्यावी असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग Corona Positive
सोमवारीच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही कोरोनाची बाधा झाली. आता काँग्रेस खासदार आणि काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनाही कोरोना झाला आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना काही सौम्य लक्षणं जाणवत होती. त्यानंतर त्यांनी कोरोनाची चाचणी केली जी पॉझिटिव्ह आली आहे.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता त्यामुळे प्रियंका गांधीही काही काळ होम आयसोलेशनमध्ये होत्या. कालच राहुल गांधी यांनी त्यांच्या सर्व रॅलीज रद्द करण्याचा निर्णय़ घेतला होता. त्यांना सौम्य लक्षणं जाणवू लागल्यानंतर त्यांनी जी कोरोनाची चाचणी केली त्यामध्ये त्यांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. राहुल गांधी यांनी संपर्कात आलेल्या सगळ्यांना कोरोनाची चाचणी करून घेण्याचं आणि काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
राजधानी दिल्लीत कोरोनामुळे परिस्थिती गंभीर; मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊनची घोषणा
राहुल गांधी यांना कोरोना झाल्याचं ट्विटरद्वारे त्यांनी स्पष्ट करताच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी त्यांना लवकर बरं होण्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत. युथ काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी यांनीही ट्विट करून राहुल गांधी यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. आज घडीला सगळा देश कोरोनाच्या तडाख्यात सापडला आहे. मात्र मला हा विश्वास आहे की तुम्ही कोरोनावर मात कराल असं म्हणत श्रीनिवास यांनीही राहुल गांधींना सदिच्छा दिल्या आहेत. तसंच लवकर बरे व्हा असंही म्हटलं आहे.
राजधानी दिल्लीत कोरोनाची स्थिती अत्यंत भीषण झाली आहे. सोमवारी 23 हजार 686 जणांना कोरोनाची बाधा झाली. तर 240 जणांचा मृत्यू झाला. सोमवारीच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांचाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. आता त्यापाठोपाठ राहुल गांधींनाही कोरोना झाला आहे. त्यांनी सगळ्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
ADVERTISEMENT