Petrol Diesel च्या वाढत्या दरांविरोधात मुंबईत काँग्रेसचं आंदोलन

मुंबई तक

• 06:16 AM • 19 Jun 2021

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. मुंबईत पेट्रोलने शंभरी पार केली आहे. परभणीत तर पेट्रोल 105 रूपये प्रति लिटरच्या पुढे गेलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घटूनही देशात इंधन दर वाढले आहेत. याचा निषेध नोंदवत काँग्रेसने मुंबईत आंदोलन केलं. मंत्री नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. भाजप हटवा शेतकरी वाचवा, महंगाई […]

Mumbaitak
follow google news

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. मुंबईत पेट्रोलने शंभरी पार केली आहे. परभणीत तर पेट्रोल 105 रूपये प्रति लिटरच्या पुढे गेलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घटूनही देशात इंधन दर वाढले आहेत. याचा निषेध नोंदवत काँग्रेसने मुंबईत आंदोलन केलं. मंत्री नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. भाजप हटवा शेतकरी वाचवा, महंगाई घटना है तो राहुलजी को लाना है.. असे फलक घेत या आंदोलनात केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

हे वाचलं का?

जानेवारी महिन्याच्या सुरूवातीपासूनच इंधनाचे दर वाढत आहेत. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस या सगळ्याच गोष्टी महाग झाल्या आहेत. त्यामुळे सामान्य माणसाचं बजेट कोलमडलं आहे. आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने राहुल गांधींच्या वाढदिवसाचं औचित्य साधत काँग्रेसने 2024 मध्ये त्यांनाच पंतप्रधान करू असाही संकल्प सोडला आहे. याच दिवशी इंधन दरवाढीविरोधात केंद्र सरकारचा निषेध करून काँग्रेसने मोर्चा काढला. मुंबईतल्या लोअर परळ भागात हा मोर्चा काढण्यात आला.

हमारा नेता कैसा हो राहुल गांधी जैसा हो असं म्हणत काँग्रेसने मोर्चा काढला. तसंच मोदी सरकारला हटवा, शेतकऱ्यांचीही पर्वा हे सरकार करत नाही. या सरकारने शेतकरी आंदोलन सुरू असूनही कृषी कायद्यांचा प्रश्न भिजत ठेवला आहे असाही आरोप यावेळी करण्यात आला. तसंच केंद्र सरकारचा दणाणून निषेध करण्यात आला.

    follow whatsapp