धनंजय साबळे
ADVERTISEMENT
Congress काँग्रेस प्रदेशाध्यक्ष Nana Patole यांनी आता मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून अकोल्याचे मुरलीधर राऊत यांचा गौरव केला होता. या मुरलीधर राऊत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याच कार्यक्रमात नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नाना पटोले ही व्यक्ती चांगली आहे हे तुम्हाला माहितच आहे असं म्हणत त्यांनी स्वतःच मुख्यमंत्री होण्याची जाहीरपणे इच्छा व्यक्त केली आहे. पारस फाटा या ठिकाणी हॉटेल मराठा या ठिकाणी हा प्रवेश सोहळा झाला. त्यावेळी नाना पटोले यांनी हे वक्तव्य केलं आहे.
राज्यात सध्या सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीमध्ये ‘ऑल इज नॉट वेल’ असं दिसतं आहे. खरंतर असं आमच्यात सारंकाही आलबेल आहे असा दावा तिन्ही पक्ष करत आहेत. मात्र तिन्ही पक्षांमधून वेळोवेळी नेत्यांकडून केलेल्या विधानांमुळे त्यावर शंका उपस्थित करण्यासाठी मोठी जागा निर्माण होते आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याचा उल्लेख केला होता.
त्यानंतर आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची ठाम भूमिका मांडली आहे. त्यामुळे निवडणुकांमध्ये काँग्रेस महाविकास आघाडीसोबत दिसणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. हे वक्तव्य समोर येऊन काही वेळ होत नाही तोच आता नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केल्याचा व्हीडिओ समोर आला आहे.
संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते झाले आहेत: नाना पटोले
दरम्यान नाना पटोले सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.आज अमरावतीत पत्रकारांशी बोलत असताना पटोलेंनी केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर चांगलीच टीका केली. मराठा आरक्षणावरुन आंदोलनाची हाक दिलेल्या संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीबद्दल विचारलं असता पटोलेंनी, येत्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर आणि संभाजीराजे एकत्र आले तर पेशवाईला याचा फटका बसेल, शिवशाहीला नाही असं उत्तर दिलं.
संभाजीराजे – प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर पेशवाईला फटका, नाना पटोलेंची भाजपवर बोचरी टीका
कोरोनानंतर राज्यात अनेक रुग्णांना म्युकरमायकोसिस या आजाराने ग्रासलं आहे. राज्यात आज ब्लॅक फंगसचे काही हजारांच्या घरात रुग्ण असताना केंद्र सरकार फक्त ४-५ हजार इंजेक्शन देतं. इंजेक्शनची काळाबाजारी केली जात आहे ज्यामुळे अनेकांना आपले जीव तर अनेकांना आपले अवयव गमवून बसावे लागत असल्याची टीका पटोलेंनी केली. केंद्र सरकारला सामान्य माणसाच्या जिवाचं काहीच घेणंदेणं नसून ते सामान्यांच्या जिवाशी खेळ करत असल्याचंही पटोले म्हणाले.
ADVERTISEMENT