कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगाची चिंता वाढवली आहे. साऊथ अफ्रिकेतून आलेल्या 94 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यापैकी दोन जण पॉझिटिव्ह आले आहेत. या दोघांच्या नमुन्यांमध्ये कोणता व्हेरिएंट आहे हे अद्याप समजलेलं नाही मात्र या दोघांचेही नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. दक्षिण अफ्रिकेतून कर्नाटकात आलेल्या सगळ्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी दोघे पॉझिटिव्ह आले आहेत.
ADVERTISEMENT
या दोघांचे प्रयोगशाळा नमुने आता या चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत की नेमका हा कोणता व्हेरिएंट आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरात खळबळ असतानाच हे वृत्त समोर आलं आहे. बंगळूरुच्या केम्पेगौडा विमानतळावर शनिवारी (27 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिकेतून विमान आले. या विमानात 594 प्रवासी होते. त्यापैकी दोन दक्षिण आफ्रिकेचे नागरिक कोरोनाबाधित आढळले आहेत.
बंगळूरूचे आयुक्त के. श्रीनिवास म्हणाले, दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोन नागरिक कोरोनाबाधित आढळले आहेत. परंतु ओमेक्रॉन स्ट्रेनबाबत अहवाल आल्यानंतरच माहिती मिळेल. विमानात 594 प्रवासी होते त्यापैकी 94 प्रवासी हे दक्षिण आफ्रिकेतून आलेले प्रवासी आहेत. सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात आली असून या सर्व रुग्णांना ‘आयसोलेशन’मध्ये ठेवण्यात आलंय. तसंच या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आलंय. अजूनही काही प्रवाशांची माहिती घेणं सुरू आहे.
दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवीनच व्हेरिएंट (विषाणूचा नवीन प्रकार) आढळून आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं अर्थात WHO ने या व्हेरिएंटला ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) असं नाव दिलं असून, हा व्हेरिएंट प्रंचड धोकायदायक असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ओमिक्रॉन व्हेरिएंट का धोकादायक मानला जातोय?
NGS-SA ने नव्या व्हेरिएंटच्या म्युटेशनबद्दल सांगितलं की ‘B.1.1.529 म्युटेशनची जिनोम सिक्वेन्स (जनुकीय रचना) खूप दुर्मिळ आहे. 30 म्युटेशन व्हायरसच्या स्पाईक प्रोटीनमध्ये आहेत. स्पाईक प्रोटीन हा असा भाग असतो, जिथे लस परिणामकारक ठरते. त्याचबरोबर स्पाईक प्रोटीनद्वारेच व्हायरस मानवी शरीरात प्रवेश करून शरीरातील पेशी संक्रमित करण्यास सुरूवात करतो.
यात काही म्युटेशन आधीपासूनच असल्याचं आढळून आलं आहे. ज्यात अल्फा आणि डेल्टाचे म्युटेशनचा समावेश आहे. आतापर्यंत क्वचित असं आढळून आलं आहे, असंही NGS-SA ने या ओमिक्रॉनच्या व्हेरिएंटबद्दल म्हटलं आहे. व्हायरस प्रभावित करण्याची क्षमता आणि लसीचा प्रभाव याबद्दलचा अभ्यास केला जात असल्याचं आफ्रिकेतील साथरोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने (सेंटर फॉर डिजिज कंट्रोल) म्हटलं आहे.
ADVERTISEMENT