वसंत मोरे, प्रतिनिधी, बारामती
ADVERTISEMENT
बारामती : पुणे जिल्ह्यातील चिंचवड देवस्थान ट्रस्ट जमीन खरेदी विक्री गैरव्यवहार प्रकरणी पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक पद्माराज गंपले आणि मोरगावचे माजी सरपंच पोपट तावरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दौंड न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या मोरगाव येथे चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या मालकीची शेकडो एकर जमीन आहे. यातील खरेदी विक्री प्रकरणात पोपट तावरे यांनी फसववणूक केली असल्याबाबतची तक्रार किरण शांताराम भोसले व आरती लव्हटे यांनी पोलिसांनाकडे केली होती. पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेतल्यानंतर राजकीय दबावामुळे यातील मुख्य आरोपी असलेल्या पोपट तावरे यास क्लीन चीट दिली होती. आणि या गुन्ह्यात त्यांचा सहभाग नाही असं न्यायालयास दर्शविले होते.
परंतू पोपट तावरे हे खरेदीदार असताना ही हेतूपूर्वक त्याला बाजूला ठेवण्यासाठी संबंधित आरोप असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी खोटे कागदपत्र कोर्टात सादर केली असल्याबाबत फिर्यादी यांनी न्यायालयात दाद मागितली होती.
यावर दौंड येथील न्यायालयाने महत्वाची निरीक्षण नोंदवली असून पोलीसांनी तावरे याला तीन गुन्ह्यातून निर्दोष सोडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच न्यायालयाने पोलिसांच्या कामावर ताशेरे ओढत बारामतीचे तत्कालीन डीवायएसपी आणि पुण्याचे उपायुक्त नारायण शिरगांवकर, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक पद्मराज गंपले, पोपट तावरे यांच्यावर कलम 420, 464,120ब,192,192,196 अशा विविध गंभीर कलमनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT